किर्लोस्कर ब्रदर्स लि. (केबीएल) ही भारतातील पहिली इंजिनिअरिंग कंपनी गेल्या १३३ वर्षांपासून कार्यरत आहे. ‘केबीएल’चा प्रख्यात वारसा फक्त त्या कंपनीपुरताच मर्यादित नसून ही कंपनी भारताच्या औद्योगिक उत्क्रांतीतील एक महत्त्वाचा अध्याय आहे. श्री. लक्ष्मणराव किर्लोस्कर व त्यांचेबंधूश्री. रामूअण्णा यांनी स्थापन केलेली ही कंपनी जागतिक बाजारपेठेत अग्रगण्य समजली जाते.
अभिमान महाराष्ट्राचा ‘किर्लोस्कर ब्रदर्स लि.
‘किर्लोस्कर ब्रदर्सलिमिटेड’ म्हणजेच अत्यंत उत्कृष्ट दर्जाची उत्पादने व सेवा, तसेच राष्ट्रवाद, विश्वासार्हता, नावीन्य, तंत्रज्ञान, मानवतावादी दृष्टिकोन...
औद्योगीकरणामुळे संपूर्ण भारतीय समाजाची प्रगती होईल हा द्रष्टेपणा, हिंमत व दृढनिश्चय त्यांच्या ठायी होता. त्यामुळे नंतर भारतात कृषी व औद्योगिक क्रांतीला चालना मिळाली व त्याचबरोबर ‘किर्लोस्कर ब्रदर्स’ हा ब्रँड तयार झाला. बेळगावमधील छोट्या सायकल दुरुस्तीच्या दुकानापासून सुरुवात करून जागतिक उद्योग समूहापर्यंत किर्लोस्कर ब्रदर्सनेमजल मारली. किर्लोस्कर ब्रँड म्हणजे राष्ट्रवाद, विश्वासार्हता, नावीन्य, तंत्रज्ञान, मानवतावादी दृष्टिकोन आणि अत्यंत उत्कृष्ट दर्जाची उत्पादनेआणि सेवा. सर्वसामान्यांचे जीवन समृद्ध करणारी व जगातील सर्वोत्तम फ्ल्यूइड मॅनेजमेंट सुविधा देणारी ही कंपनी आहे.
प्रवासाची सुरुवात…
१८८८ मध्ये भारत ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. त्या वेळी अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्या भारतीय कंपन्या अस्तित्वात होत्या. त्यामुळेरोजगाराच्या संधींची वानवा होती. तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्याशिवाय आणि भारतात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याशिवाय भारताची प्रगती अशक्य आहे, हेद्रष्ट्या श्री. लक्ष्मणरावांनी जाणले. शेती हा भारतातील प्राथमिक व्यवसाय आहे. शेतीची कामे लवकर होऊन उत्पादनात वाढ होण्यासाठी शेतीच्या आधुनिक अवजारांची गरज आहेहेश्री. लक्ष्मणरावांनी ओळखले. यातूनच १९०१ मध्ये पहिल्या स्वदेशी बनावटीच्या चारा कापण्याच्या यंत्राचा जन्म झाला. पाठोपाठ १९०३ मध्ये लोखंडी नांगराचे उत्पादन भारतात झाले. ही दोन्ही अवजारे संपूर्णपणे किर्लोस्कर ब्रदर्सच्या बेळगाव येथील कारखान्यात तयार झाली होती.
पुण्यातील कृषी प्रदर्शनात औंधच्या महाराजांसोबत श्री. लक्ष्मणराव किर्लोस्कर (1926).
अभियांत्रिकी क्रांतीचे जनक
निवासी भागातून उद्योग हलवण्यास सांगण्यात आले, त्या वेळी औंधच्या राजानेत्यांच्या संस्थानात उद्योग सुरू करण्याचे निमंत्रण दिले. ते कंपनीने स्वीकारले आणि किर्लोस्करवाडीतील कारखान्याची स्थापना झाली. ती किर्लोस्कर ब्रदर्सच्या यशाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेली. किर्लोस्करवाडी ही भारतातील दुसरी औद्योगिक वसाहत आहे. हा कारखाना स्थापन करताना श्री. लक्ष्मणराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निवडुंग व सापांनी भरलेल्या उजाड माळरानाचेरूपांतर एका विकसित औद्योगिक वसाहतीत केले. येथील कारखाना सर्वोत्तम उत्पादनक्षमता व सर्व आधुनिक सविु धांनी युक्त होता. आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत श्री. राजा भवानराव (बाळासाहेब) पंत प्रतिनिधींनी श्री. लक्ष्मणराव आणि त्यांच्या कंपनीला प्रोत्साहन आणि मदतीचा हात दिला. अनेक अडचणी पार करत किर्लोस्कर ब्रदर्सची ओळख तयार झाली. किर्लोस्करांनी आपलेएक स्थान निर्माण केले. देशभरात एक विश्वासार्हता त्यांनी निर्माण केले. श्री. शंकरराव किर्लोस्कर यांनी ‘केबीएल’मध्ये कार्यरत असताना सर्वनां आवडणारा असा किर्लोस्कर लोगो तयार केले आणि वापरात आणला. याच काळात कंपनीने अभियांत्रिकी उत्पादने तयार करण्यास सुरुवात करून आपला व्यवसाय आणखी वाढवला. हातपंप, भुईमुगाच्या शेंगा सोलण्याचे यंत्र, ऊस पिळण्याचे यंत्र, लोखंडी फर्निचर, डिझेल, केरोसीन आणि ऑइल इंजिन्स, इलेक्ट्रिक मोटर्स आणि हवेच्या दाबाचे यंत्र (Air Compressor) आदी उत्पादने बनवण्यास त्यांनी सुरुवात केले. विशेष म्हणजेअशी उत्पादने भारतात पहिल्यांदा बनत होती. श्री. लक्ष्मणराव किर्लोस्कर आणि त्यांचे पुत्र श्री. शंतनुराव यांच्या नेतृत्वाखाली ‘केबीएल’नेही त्याकाळची आधुनिक गणली जाणारी उत्पादने बनवण्यास यशस्वी सुरुवात केले. तेव्हा भारत औद्योगीरणाच्या प्रक्रियेत इतर जगाच्या तुलनेत बराच मागे होता. पुणे कुषी विद्यापीठात 1926 मध्ये आपली डिझेल इंजिनची उत्पादने प्रदर्शनात ठेवली, तेव्हा ती आयात केलेले आहेत, असेच लोकांना वाटले. भारतीय ग्राहकांना तर या उत्पादनांनी आकर्षित केलेच; पण त्यांच्या उच्च गुणवत्तेमुळे 1930 पासून त्यांची निर्यातदेखील केले जाऊ लागली. आधीपासनूच प्रस्थापित आणि प्रसिद्ध असे ब्रिटिश स्पर्धक भारतीय बाजारपेठेत कार्यरत असतानाही ‘केबीएल’च्या उत्पादनांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत होती. उच्च दर्जाची उत्पादने तयार करणेहेपहिल्या उत्पादनापासनूच ‘केबीएल’च्या रक्तातच भिनले आहे. परदेशात बनवलेल्या नांगरांना ‘केबीएल’ने बनवलेल्या नांगरांनी बाजारपेठेत टक्कर दिली. उच्चतम गुणवत्ता, क्षमता असलेले उत्पादने आणि विश्वासार्हता यामुळे ‘केबीएल’नेभारतीय नागरिकांमध्चये नाही, तर ब्रिटिशांमध्ही ये लोकप्रियता मिळवली. भारतातल्या कृषी आणि औद्योगिक क्रांतीचे श्री. लक्ष्मणराव हे जनक बनले. ‘मेक इन इंडिया’ची मुहूर्तमेढ त्यांनीच खऱ्या अर्थाने रोवली.
सामाजिक सुधारणा
एक यशस्वी कारखाना आणि कंपनी असण्याबरोबरच, किर्लोस्करवाडीने अस्पृश्यतानिवारण, जातिभेद निर्मूलन, महिला सबलीकरण अशा सामाजिक सुधारणांनाही हातभार लावला. नव्य आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे शेतकऱ्यांना प्रशिक्षणही दिले. किर्लोस्करवाडी ही देशातील छपाई कारखाना सुरू करणारी पहिली कंपनी होती. यातूनच पुढे किर्लोस्कर खबर, मनोहर आणि स्त्री या नियतकालिकांचा जन्म झाला. सामाजिक जागरूकता निर्माण करण्यात या नियतकालिकांचे योगदान मोठेआहे. श्री. शंकरराव किर्लोस्करांनी त्याकाळात सामाजिक व सांस्कृतिक विषयांवर जागरुकता निर्माण करण्याचे प्रतिनिधित्व केले. ‘स्त्री’ मासिकाने स्त्रियाना आपला आवाज समाजात पोहोचवण्यासाठी हक्काचे व्यासपीठ दिले. श्री. लक्ष्मणराव स्वतः एक उत्तम व्यावसायिक होते, तसेच एक समाजसुधारकदेखील होते. त्यांच्या संपूर्ण प्रवासात आणि आयुष्यात त्यांच्या पत्नी राधाबाई त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या होत्या. किर्लोस्करवाडीच्या यशात त्यांचाही मोठा हातभार आहे.
किर्लोस्कर चरखा फिरवताना महात्मा गांधी.
नवीन कंपन्यांची स्थापना
भारतातील औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी अभियांत्रिकीच्या विविध क्षेत्रात उडी घेण्याचेश्री. लक्ष्मणरावांनी ठरवले. आपली मुले आपल्या तालमीत तयार झाली आहेत. त्याचप्रमाणेत्यांच्याकडे योग्य ती शैक्षणिक गुणवत्तादेखील असल्यामुळेती किर्लोस्कर ब्रँडचा विस्तार विविध क्षेत्रात करून यशस्वी करतील याची त्यांना खात्री होती. त्याप्रमाणे प्रत्येकान किे र्लोस्करवाडी सोडून आपापल्या क्षेत्रात वाटचाल सुरू केले…
- श्री. राजाराम किर्लोस्कर यांनी १९४० मध्ये कर्नाटकातील हरिहर येथे ‘मैसूर किर्लोस्कर’ ही मशिन टूल बनवणारी कंपनी सुरू केली.
- १९४६ मध्ये श्री. शंतनुरावांनी ‘किर्लोस्कर ऑइल इंजिन लिमिटेड’ची(KOEL) पुण्यात स्थापना केली.
- १९४६ मध्ये श्री. रवी किर्लोस्कर यांच्या नेतृत्वाखाली बंगलोर येथे ‘किर्लोस्कर इलेक्ट्रिक ’ कंपनीची सुरुवात.
- १९६६ मध्ये श्री. प्रभाकर किर्लोस्करांकडून पुण्यातील पहिल्या पंचतारांकित हॉटेल ‘ब्लू डायमंड’ची स्थापना.
वरील तीन कंपन्या ‘मैसूर किर्लोस्कर’, ‘किर्लोस्कर ऑइल इंजिन लिमिटेड’,‘किर्लोस्कर इलेक्ट्रिक’ या किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड मधून वेगळे काढून तयार केल्या. श्री. लक्ष्मणरावांनी पेरलेल्या औद्योगिकी करणाच्या बीजाचे श्री. शंतनुरावांनी वटवृक्षात रूपांतर केले. त्यांनी १९२६ मध्ये किर्लोस्कर ब्रदर्समध्ये काम सुरू केले. अमेरिकेमधील MIT मधून पदवीधर झालेल्या श्री. शंतनुरावांचा शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास होता. १९३६ मध्ये किर्लोस्कर ब्रदर्सची सुत्रे श्री. शंतनुरावांच्या हाती आली. त्यांची चाणाक्ष आणि व्यापारी दूरदृष्टी आणि पुरोगामी दृष्टिकोन यामुळे किर्लोस्कर ग्रुप भरभराटीला आला. त्यांच्या महत्त्वाकांक्षी आणि पायाभूत व्यावसायिक धोरणाने किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. श्री. शंतनुरावांनी किर्लोस्कर ऑइल इंजिन व्यतिरिक्त किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड मधून १९५७ मध्ये ‘किर्लोस्कर न्मॅयूटिक कंपनी लिमिटेड’ आणि १९६२ मध्ये ‘किर्लोस्कर कमिन्स लिमिटेड’ची सुरुवात केली. किर्लोस्कर ग्रुप आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रशंसेस पात्र ठरला. या काळात किर्लोस्कर ग्रुपची व्यावसायिक उलाढाल ३२,४०१ टक्क्यांनी वाढली. देशातील सर्वाधिक वाढ म्हणून याची नोंद ठरली.
किर्लोस्करांचा लोखंडी नांगर धरलेले जवाहरलाल नेहरू.
श्री. शंतनुराव म्हणत, ‘‘भविष्याची चिंता करू नका, तेघडवा.’’ त्यांनी हे करून दाखवले. तेअत्तयं परोपकारी होते. त्यांनी पत्नी यमुनाताईंना महिलांच्या कल्याणासाठी काम करण्यास प्रोत्साहन दिले. यमुनाताईंनी महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी महिला उद्योगाची स्थापना केली. श्री. शंतनुरावांच्या औद्योगिक क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना १९६५ मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्कारान से न्मानित केले. त्यांनी अनेक प्रथितयश संस्थांमध्ये महत्त्वाची पदेभूषविली. ती पुढीलप्रमाणे : महाराष्ट्रचेंबर ऑफ कॉमर्सअडँ इंडस्ट्रीचे अध्यक्षपद (१९५९-६९), फेडरेशन ऑफ इंडिया चेंबर्स ऑफ कॉमर्स अडँ इंडस्ट्रीचे अध्यक्षपद (१९६५-६६) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालकपद (१९७७-८२).
ठळक कामगिरी…
केबीएल पंप्सच्या वापराने भारतातील ४० टक्के जनतेला पिण्याचे पाणी आणि ६० टक् जमीन के सिंचनाखाली आली आहे. गुजरातमधील सरदार सरोवर नर्मदा निगम लि. योजनेअंतर्गत केबीएल पंपाचा वापर करून ३ कोटी लोकांना पाणीपुरवठा केला जात आहे. जगातील सर्वात उंच स्मारक `स्टॅच्यू ऑफ यनिुटी`ला (गुजरात) किर्लोस्कर अग्निरोधक पंपचा पुरवठा. जगातील सर्वांत उंचीवरील बोगदा ‘अटल टनेल’ येथे केबीएल अग्निरोधक
पंप्सचा वापर.
- अणुभट्टी व अणुउर्जा प्रकल्पात.
- संरक्षण क्षेत्रात.
- ISRO च्या स्वदेशी मेड इन इंडियामध्ये
श्री. लक्ष्मणराव किर्लोस्कर आपल्या मुलांसमवेत.
सामाजिक उत्तरदायित्य
आपण समाजाचेही देणे लागतो या जाणिवेतून १९९४ मध्ये `के बीएल`ने विकास चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन के ला. या ट्रस्टच्या माध्यमातून मुख्यतः शिक्षण व आरोग्यासाठी काम के ले जाते. कोविड-१९ च्या महासाथीत श्रीमती प्रतिमा किर्लोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्टने खूप मोठा मदतीचा हात दिला. संपूर्ण भारतभर शिधापुरवठा, दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे वाटप, एकूण २० लाख थाळ्या माध्यान्ह भोजनाचा पुरवठा, कोविड योद्ध्यांना पीपीई किट उपलब्ध करून देणे, संसर्ग झालेल्या गावांचे निर्जंतुकीकरण, अशी अनेक कामे ट्रस्टने केली. याआधीही ट्रस्टने भारतात व भारताबाहेरही संकटकाळी मदतीचा हात पुढे के ला आहे. थायलंडमध्ये गुहेत अडकलेल्या फुटबॉल खेळाडूच्या संघाला सुटके साठी मदत; महाराष्ट्र, के रळ येथे पूरस्थितीच्या वेळी किर्लोस्करच्या पूर नियंत्रक पंप्सची मदत, ही काही ठळक उदाहरणे.
१९८५ नंतरचे केबीएल
श्री. शंतनुरावानंतर श्री. चंद्रकांत किर्लोस्कर आणि नंतर त्यांचे पुत्र श्री. संजय किर्लोस्कर यांनी व्यवस्थापकीय संचालकपदाची धुरा सांभाळली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कं पनीचा देशात तसेच परदेशांतही विस्तार झाला. किर्लोस्कर वाडी, देवास, अहमदाबाद, कोईमतूर, शिरवळ आदी ठिकाणी कंपनीची उत्पादन केंद्रे स्थापन झाली. ग्रामीण भागातील जनतेला रोजगार मिळावा हा त्यामागील हेतू होता. किर्लोस्करवाडी येथील प्रकल्पात ०.३७ KW ते ३० MW सेंट्रिफ्युगल पंपांची, तर २०१४ पासून भारतात पहिल्यांदा थ्रीडी प्रिंटिंग मशिनचा वापर करून पंप कास्टिंगची सुरवात झाली. कं पनीच्या सर्व उत्पादन केंद्रांत अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर के ला आहे. कं पनीच्या कोइमतूर येथील प्लांटचे वैशिष्ट्य म्हणजे त्या पंप कारखान्यात १००% महिला काम करतात. `लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड`मध्ये याची नोंद झाली आहे. गेल्या काही दशकात किर्लोस्कर ब्रदर्सने काही महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम करून ‘आत्मनिर्भर भारत’ या योजनेलाही हातभार लावला आहे.
केबीएल पंप्सचा जगभरात वापर…
वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जगातील महत्त्वाच्या रचनांमध्ये अग्निरोधक पंप्सचे योगदान आहे, उदा. व्हाइट हाउस, बुर्ज अल अरब, मरीना बे सँड्स, सिडनी ओपेरा हाउस, जगातील सर्वांत लांब समुद्रातील पूल-हाँगकाँग ते मकाऊ इजिप्तमध्ये ‘किर्लोस्कर म्हणजे पंप’ अशी ओळख. के बीएल पंपाच्या वापराने सिनेगल, लाओस, कं बोडिया या देशांमध्ये आर्थिक सुबत्ता आली. तांदळाची आयात करणारे हे देश निर्यात करू लागले. तसेच पूर्व आशियायी देशांना पुरापासून वाचविण्यात मदत होत आहे. ‘के बीएल’ जगभरात आजच्या घडीला सर्वाधिक विक्री आणि सेवा देणाऱ्या कं पन्यांपैकी एक आहे. फ्रान्स येथील आंतरराष्ट्रीय थर्मोन्यूक्लिअर प्रायोगिक अणुभट्टी प्रकल्पात स्पेशालिस्ट पंप्सचा पुरवठा करणारी महत्त्वाची कं पनी. सध्या `के बीएल` ही जगभरात विक्री आणि सेवा पुरवणारी बहुराष्ट्रीय कंपनी आहे. १५ जानेवारी २०२० रोजी पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणून ‘के बीएल’ने १०० वर्षे पूर्ण केली. कंपनीच्या इतिहासातील हा महत्त्वाचा टप्पा साजरा करण्यासाठी दिल्ली येथे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी व पुणे येथे श्री. रतन टाटा यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम झाले. या दीर्घवाटचालीत कं पनीने तिच्या सर्व ग्राहक, कर्मचारी, भागीदार, भागधारकांप्रती बांधिलकी जपली आहे, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. कंपनीने शंभर वर्षांच्या वाटचालीत केवळ चार अपवाद वगळता दरवर्षी भागधारकांना लाभांश दिला आहे.
पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांच्यासमवेत शताब्दी महोत्सवप्रसंगी (वर्ष : २०२०).
सांगली, महाराष्ट्रातील पूर मदत मोहीम. थायलंडच्या थाई गुहा बचाव साइटवरील ‘केबीएल’ टीम.
आव्हानांचे रूपांतर संधींमध्ये…
कोरोना महासाथीच्या या काळात सर्वांनाच असंख्य अडचणींचा सामना करावा लागला, आणि ‘के बीएल’ही त्याला अपवाद नाही. परंतु या कं पनीने गेल्या १३३ वर्षांपासून अनेक आव्हाने आणि अडथळ्यांना तोंड दिलेले आहे. त्यातून ही कं पनी तावून सुलाखून निघाली आहे. १९१८ मधील महासाथ, दोन जागतिक महायुद्धे अशा मोठ्या आव्हानांशी देखील ‘के बीएल’ने सामना के लेला आहे. प्रत्येक आव्हानाकडे एक संधी म्हणून बघत कं पनीने अडचणीचे रूपांतर विकासाच्या संधीमध्ये के ले. अशा रीतीने टिकू न राहत, विकसित होत आणि अधिकाधिक गुणवत्तेकडे ‘के बीएल’ प्रवास करते आहे. हाच समृद्धीचा, प्रगतीचा आणि यशाचा वारसा घेऊन किर्लोस्कर कं पनी भविष्यातही यशस्वी वाटचाल करत राहणार आहे, महाराष्ट्र आणि भारताचे जगात प्रतिनिधित्व करत राहणार आहे, यात काही वादच नाही!
गौरवगाथा
भविष्यातील आव्हानांसाठी सुसज्ज!
भारत, हॉलंड व ब्रिटन येथे असलेल्या संशोधन आणि विकास विभागामुळे (आर. अँड डी.) आणि अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करण्याच्या धोरणामुळे बाजारपेठेच्या आणि ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्यात कं पनीला यश मिळाले. उच्च दर्जा आणि उत्पादन वापराच्या संपूर्ण कालावधीतील न्यूनतम खर्च या तत्त्वावर कं पनीचे ग्राहक धोरण आधारलेले आहे. थ्री-डी प्रिंटर्स, उच्च तंत्रज्ञानाधारित (४.०) उत्पादनप्रक्रिया, आर्टीफिशियल इंटलिे जन्स तसेच ऑगमेंटेड रिॲलिटी, व्हर्च्युअल रिॲलिटी आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज या माहिती-तंत्रज्ञानातील सर्व तंत्रांचा अवलंब के ला जातो. कं पनीच्या ग्राहकाभिमुखतेचे यश त्यात सामावलेले आहे. कमाल कार्यक्षमतेच्या आधारे ऊर्जेची बचत करण्याचा कं पनीचा प्रयत्न असतो. कल्पक आणि नावीन्यपूर्ण उत्पादने आणि तंत्रज्ञानाच्या वापरातून ‘किर्लोस्कर ब्रदर्सलि.’ हे साध्य करते. ‘लोएस्ट लाइफसायकल कॉस्ट पम्प’ (एलएलसी) ही मालिका म्हणजे ‘किर्लोस्कर ब्रदर्स’चे वशिैष्ट्यपूर्ण उत्पादन आहे. प्रत्क ये टप्प्यावर सर्जनशीलतेचा अवलंब होत असल्यामुळे कंपनीला खर्चात मोठ्या प्रमाणावर बचत करता येते. मग तो भांडवली खर्च असो, वा प्रत्यक्ष प्रकल्प कार्यान्वयातील असो. उत्पादन वापराच्या संपूर्ण कालावधीतील खर्चात मोठ्या प्रमाणावर बचत हे कंपनीच्या उत्पादनांचे वशिैष्ट्य आहे.
पंपांचे नियंत्रण दुरून करणारे आणि कमीत कमी जोखीम पत्करून देखभाल करू शकणारे इंटरनेट आधारित किर्लो-स्मार्ट तंत्रज्ञान हे सर्जनशील कार्यपद्धतीचे एक मुख्य उदाहरण म्हणावे लागेल. ब्रिटनमधील या विशिष्ट क्षेत्रातील बाजारपेठेचा ८० टक्के हिस्सा कंपनीला मिळविता आला, तो याच कार्यपद्धतीच्या जोरावर. भारतातील बहुतेक नव्या आण्विक प्रकल्पांत किर्लोस्कर ब्रदर्सचे ‘काँक्रिट व्हॉल्यूट पंप’ वापरले जातात. जागेची बचत करणारे अग्निरोधक पंप, तसेच कंपनीने तयार के लल्या ‘हायड्रो न्युमॅटिक सिस्टिम्स’ हीदेखील कं पनीची ओळख निर्माण करणारी महत्त्वाची उत्पादने आहेत. गेल्या पाच वर्षांत कं पनीच्या आठ उत्पादनांनी ‘इंडिया डिझाईन मार्क’ मिळविला आहे. हा मोठा सन्मान मानला जातो. के बीएल ही कायमच एक जबाबदार आणि मानवतावादी धोरण असणारी कं पनी राहिली आहे. ब्रिटनमधील एसपीपी पंपचे (SPP PUMPS) व्यवस्थापकीय संचालक श्री. आलोक किर्लोस्कर यांनी आर्टीफिशियल इंटलिे जन्स तंत्रज्ञानाच्या वापराची सुरुवात आपल्या कं पनीत करून दिली. ‘‘काळानुसार बदलत्या तंत्रज्ञानाला आत्मसात करून पुढे जात राहणे हीच यशस्वी व्यवसायाची गुरुकिल्ली आहे’’ असे मत ते मांडतात. किर्लोस्कर इबारा पम्प्स लिमिटेड (KEPL) च्या व्यवस्थापकीय संचालिका रमा किर्लोस्कर म्हणतात की, ‘‘अधिकाधिक महिलांना व्यवसायात समाविष्ट करून त्यांना काम करण्याची संधी देणे हे अधिक सर्वसमावेशक आहेच, पण व्यवसायासाठी एका चांगल्या भविष्याची ती पायाभरणी आहे.’’ किर्लोस्कर कार्यसंस्कृतीचे उत्तम गुणवत्ता आणि कामाची सर्वांना समान संधी हे मूलभूत घटक आहेत. कुटुंबातील प्रत्येक घटक योगदान देण्यास पात्र आहे आणि त्यामुळेच व्यवसायाला विविध दृष्टिकोन लाभतात, तो अधिक सर्वसमावेशक, भविष्यासाठी सुसज्ज आणि कालातीत राहण्यासाठी मदत होते, असेही त्या सांगतात.