विद्यार्थीदशेपासूनच ललित गांधी यांच्या सार्वजनिक जीवनाला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. विविध समाजघटकांना मदतीसाठी तेपुढे सरसावले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून ते स्थानिक पातळीवर सक्रीय झाले आणि पुढेअनेक राज्यस्तरीय बैठका, परिषदांचे त्यांनी यशस्वी संयोजन केले. याच दरम्यान ते व्यवसायातही आलेआणि वयाच्या चौदाव्या वर्षीच त्यांनी महावीर इलेक्ट्रॉनिक्स या पुण्यानंतरच्या महाराष्ट्रातील पहिल्या टीव्ही शोरूमचा प्रारंभ कोल्हापुरात केला. हेसाल होते १९८२. व्यवसाय आणि सामाजिक काम अशी योग्य सांगड घालत त्यांचा हा सारा प्रवास सुरू राहिला. वयाच्या एकोणीसाव्या वर्षी त्यांनी सहकारी संस्थेची स्थापना केली आणि पुढेआंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत सहकारी फेडरेशनचे केवळ प्रतिनिधीत्वच नव्हे तर नेतृत्वही केले. १९९४ साली कोल्हापुरात पहिल्यांदाच त्यांनी ‘आर्चिस गॅलरी‘ ही अभिनव संकल्पना आणली आणि ती यशस्वीही केली. ग्रीटींग्ज आणि भेटवस्तूच्या या दालनाला ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला. कोल्हापूरसह पुणे आणि नाशिकमध्ये शत्रुंजय इन्फ्रास्ट्रक्चर्सच्या माध्यमातून त्यांनी विविध संकल्पना पुढे आणल्या आणि यशस्वी केल्या. औषध पुरवठ्यापासून तेशासकीय कॉन्ट्रॅक्ट, लॅंड बॅंकींग, लॅन्ड डेव्हलपमेंट अशा सर्वच क्षेत्रात नवसंकल्पनावर भर देत त्यांचा कार्य विस्तार वाढतच गेला.
ललित गांधी नावाचा ‘लोकल टू ग्लोबल ब्रॅंड
वयाच्या चौदाव्या वर्षीपासून व्यवसायात आलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे विद्यमान वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी पुढे व्यापार, उद्योग, कृषी शिक्षण, सहकार, बांधकाम अशा सर्वच क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला. केवळ स्वतःचा व्यवसाय व व्यापार हेच त्यांचे कार्यक्षेत्र कधीच राहिले नाही. त्याच्याही पलिकडे या प्रत्येक क्षेत्रातील विविध समस्या सोडवणुकीसाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि कुशल संघटन कौशल्याच्या जोरावर शासनाला ठोस निर्णय घ्यावे लागले. सर्वच समाजघटकांसाठी प्रसंगी रस्त्यावरही उतरून लढाई करायला ते कधी मागे राहिले नाहीत. व्यापाऱ्यांसाठी लढताना जीवे मारण्याच्या धमक्या मिळूनही मागे हटले नाहीत. निडरपणे संघर्ष करून त्यांनी यश मिळवले. म्हणूनच आज राज्यातील व्यापाऱ्यांचे आक्रमक व लढवय्ये नेतृत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. त्याचवेळी समाज ज्या ज्या वेळी संकटात आला त्या त्या वेळी मदतीसाठीही ते नेहमीच सगळ्यात पुढे राहिले. अफलातून संघटन कौशल्य आणि सेवावृत्तीच्या या ‘लोकल टू ग्लोबल' ब्रॅंडविषयी...
जैन समाजाचे राष्ट्रीय नेतृत्व
जैन समाजाला २०१४ मध्ये राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्यांक दर्जा मिळाल्यानंतर स्थापन झालेल्या ‘ऑल इंडिया जैन मायनोरीटी फेडरेशन या शिखर संस्थेचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रासह देशभरातील समाजासाठी त्यांनी विविध योजना राबवल्या. अल्पसंख्यांक कल्याण योजना, अल्पसंख्यांक विषयक कायदेशीर तरतूदी, या संबंधीच्या विविध राज्य सरकारांच्या योजनांचा सखोल अभ्यास करून त्यांनी त्या यशस्वी केल्या. एकूणच या क्षेत्रातील अभ्यासू म्हणून त्यांचा देशभरात लौकिक आहे. फेडरेशनच्या माध्यमातून त्यांनी देशभरात नऊशेहून अधिक जाहीर सभा आणि कार्यशाळांच्या माध्यमातून जनजागृतीचेकाम केले. सात वर्षात जैन समाजातील तीन लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना सहाशे वीस कोटी रूपयांची शिष्यवृत्ती मिळवण्यामध्ये त्यांनी महत्वाचा सहभाग राहिला. कौशल्य विकास प्रशिक्षण योजनांच्या माध्यमातून गेल्या वर्षात नऊ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याबरोबरच शिक्षण कर्ज उपलब्ध करून देण्यासाठीही त्यांचा पुढाकार राहिला. समाजातील उपेक्षितांसाठी विशेष योजना आणल्या. धर्मस्थान, सम्मेदशिखरजीसारख्या तीर्थक्तषे्रांच्या सुरक्षिततेसाठी यशस्वी पुढाकार घेतला. जैन समाजाच्या सर्व पंथ, संप्रदायांना एकत्रित आणून संघटित करण्याचेमहत्वपूर्ण कार्य केले. अल्पसंख्यांक योजनांच्या माहितीसाठी त्यांनी तीन पुस्तके प्रकाशित केली. अल्पसंख्यांक सक्षमीकरण (भाग एक), अल्पसंख्यांक सक्षमीकरण (भाग दोन) आणि अल्पसंख्यांक सक्षमीकरण (भाग तीन) या पुस्तकांच्या अनुक्रमेदहा हजार, पंधरा हजार आणि वीस हजार इतक्या पुस्तकांच्या प्रती वितरित करण्यात आल्या.
अपंग आणि कॅन्सरग्रस्तांसाठी कार्य
कॅन्सरसारख्या दुर्धर रोगापासून लोकांना वाचवण्यासाठी ललित गांधी यांनी दीड कोटी रूपये खर्च करून पहिले अत्याधुनिक फिरत्या कॅन्सर चिकित्सा केंद्राची उभारणी केली. सहा प्रकारच्या कॅन्सर तपासणीची सुविधा या मोबाईल डिटेक्शन सेंटरमध्ये उपलब्ध करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात पाचशेहून अधिक शिबिरांचेआयोजन केले आणि एक लाख पस्तीस हजार लोकांची मोफत तपासणी झाली. त्यातून हजाराहून अधिक कॅन्सरचे रूग्ण आढळले आणि त्यांना उपचारासाठीही सहकार्य केले. फ्रान्स, मलेशिया येथे आंतरराष्ट्रीय कॅन्सर परिषदेत प्रकल्पाचे सादरीकरण केले. कॅन्सर विषयातील कार्यामुळेजागतिक आरोग्य संघटनेच्या समितीत त्यांची निवड झाली. मॉरीशस येथील जगातील सत्तर निवडक वैद्यकीय तज्ञांच्या बैठकीत त्यांचा सहभाग राहिला. ‘डिसेबिलिटी फ्री इंडिया‘ उपक्रमांतर्गत बारा हजारांवर अपंगांना कृत्रिम अवयवांचे प्रत्यारोपन केले. त्यासाठी हनुमानगढ (राजस्थान) येथील स्वतःत्या उत्पादन व संशोधन केंद्रातून कृत्रिम अवयवांची निर्मिती केली आणि मोफत अवयव प्रत्यारोपणासाठी देशभर शिबिरांचे आयोजन केले. देशभरातील पाचशेहून अधिक शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचा विशेष गौरव झाला. कोल्हापुरात रूग्णवाहिका आणि पिंपरी-चिंचवड परिसरात शववाहिनी सेवा देण्यातही त्यांचा पुढाकार राहिला. २०१९ आणि यंदाच्या महापूरकाळात पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्याबरोबरच कोरोना काळात गरजूंना मदतीसाठीही विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी पुढाकार घेतला.
ग्रामीण शाळा ते इंटरनॅशनल स्कूल
‘जिथे कमी तेथे आम्ही‘ हे ब्रीद घेवून १९९१ साली ललित गांधी यांनी वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी समाजातील तरूण सहकाऱ्यांसोबत महावीर एज्युकेशन सोसायटी ही बहुउद्देशीय सार्वजनिक विश्वस्त संस्था स्थापन केली. शिक्षणाबरोबरच अपंग पुनर्वसन, महिला व बाल कल्याण, युवा विकास, क्रीडा विकास आणि प्राणी कल्याण या क्षेत्रात ही संस्था आजही कार्यरत आहे. १९९३ साली महावीर इंग्लीश स्कूल आणि ब्लॉसम प्ले स्कूलची स्थापना केली. दर्जेदार शिक्षणासाठी आज हेशैक्षणिक संकुल प्रसिध्द असून प्रत्येक वर्षी प्रवेशासाठी येथेमोठी ‘वेटींग लिस्ट’ राहते. दोन हजारहून अधिक विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. विविध शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षांपासून तेअगदी दहावीपर्यंत शंभर टक्के निकालाची परंपरा या शाळांनी आजही जपली आहे. पुढे जावून २००५ साली टिचर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची स्थापना झाली. शिवाजी विद्यापीठाची संलग्नता घेवून इंग्रजी माध्यमातील शिक्षक घडवण्यासाठी ही संस्था सुरू झाली आणि प्रत्येक वर्गाचा निकाल शंभर टक्के लागला. इंग्रजी माध्यमांच्या शाळा वाढत असताना त्यासाठी आवश्यक या माध्यमातील शिक्षकांची त्यामुळे उपलब्धता झाली. क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, फेन्सिंग, व्हॉलीबॉल, रेसलींग, ॲथलेटीक्स, जिम्नॅशियम आदी खेळांचे प्रशिक्षण देण्यासाठी सह्याद्री स्पोर्टस ॲकॅडमीचीही स्थापना केली.
अनोखी गुरूदक्षिणा
ललित गांधी ज्या विकास विद्यामंदीर शाळेमध्ये शिकले. तेथील शिक्षक आर. पी. शिंदे १९९९ साली केर्ली गावचे सरपंच झाले. गावात मुलांसाठी हायस्कूलच नव्हते. त्यांनी ललित गांधी यांना गावात मुलांसाठी हायस्कूल सुरू करण्याची मागणी केली. ललित गांधी यांनी सत्तर लाख रूपये खर्चुन प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक प्रशिक्षणासह भव्य शैक्षणिक संकुल उभारले. या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संपूर्ण मोफत व दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. ही शाळा म्हणजे शिंदेसरांना गुरूदक्षिणा दिल्याचे श्री. गांधी आवर्जून सांगतात. त्यांच्याही पुढेजावून ग्रामस्थांच्या आग्रहावरून २००४ पासून शत्रुंजय विद्यालय ही प्राथमिक शाळा सुरू केली. येथेही सर्व शिक्षण मोफत दिले जाते.
व्यापारी उद्योजकांसाठी रस्त्यावरच्या लढाईतही अग्रेसर
महाराष्ट्रातील रेल्वे, विमान सेवांचा प्रश्न असो किवा व्यापारी, उद्योजकांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी प्रसंगी रस्त्यावरच्या लढाईतही ललित गांधी आजवर अग्सर रे राहिले. व्यापाऱ्यांना खंडणीसारख्या प्रकारापासून संरक्षणासाठी त्यांनी तीव्र आंदोलन छेडले. प्रसंगी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवून मागण्या मान्य करून घेतल्या. कोरोनाच्या काळात तर व्यापारी आणि उद्योजकांना मोठ्या आर्थिक कोंडीला सामोरे जावे लागले. त्यामुळेलॉकडाऊन काळात उद्योग व व्यापाराला परवानगीसाठी व्यापाऱ्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आणि त्याचेराज्यस्तरावर नेतृत्वही श्री. गांधी यांनी केले. भारतीय कायद्यांचे उल्घनलं करून छोट्या व्यावसायिकावं र घाला घालणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यावर कडक कारवाई करावी, या मागणीसाठीच्या आंदोलनातही त्यांचा सक्रीय पुढाकार आहे.
भारत सरकारने आत्मनिर्भर पॅकेज घोषित करताना एमएसएमई क्षेत्राच्या वाढविलेल्या मर्यादा लागू करण्याचे आदेश रिझर्व्ह बॅंकेने देशातील सर्व बॅंका, आर्थिक संस्था तसेच नॉन बॅंकिंग फायनान्स कंपन्यांना दिले. त्यामुळे आत्मनिर्भर भारत योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग खुला झाला. त्यासाठी ललित गांधी यांनी पुढाकार घेतला. केंद्र सरकारनेआत्मनिर्भर पॅकेज घोषित करताना सेवा क्षेत्र व उत्पादन क्षेत्रातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना एकत्रित केले. या पॅकेजमध्ये व्यापाऱ्यांचा समावेश नव्हता. तत्कालीन अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्यामार्फत पंतप्रधानांकडे हस्तक्पषे करून या पॅकेजमध्ये व्यापाऱ्यांचाही समावेश करून घेण्यात यश मिळवले. रिझर्व्ह बॅंकेच्या आदेशामुळे या सर्व घटकांना पॅकेजचा लाभ मिळण्याचा मार्ग खुला झाल्याने व्यापारी व उद्योजक या दोन्ही घटकांची वाढीव भांडवलाची गरज पूर्ण होण्यात येणाऱ्या अडचणी दूर झाल्या. कोल्हापुरातून नियमित विमानसेवा सुरू व्हावी, यासाठी ललित गांधी यांनी विविध संस्था, संघटनांच्या माध्यमातून पाठपुरावा केला. कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवाही त्यांनी पाठपुरावा केल्यामुळे मंजुर झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात छत्रपती राजाराम महाराज यांनी विमानतळ सुरू केले. त्यामुळे कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचेनाव द्यावे यासाठीही त्यांनी राज्य आणि केंद्रीय पातळीवर पाठपुरावा करुन यश मिळविले. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) कायदा आणि “जीएसटी’ कायद्यातील जाचक तरतुदी रद्द कराव्यात, यांसह विविध मागण्यांसाठी कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया ट्डरे र्स (कॅट) च्या वतीनेशासनाकडेललित गांधी यांचा पाठपुरावा सुरू आहे.
शासनानेई-कॉमर्स व्यापारासाठी धोरण जाहीर करावे, त्यात योग्य अधिकार असणारी समिती नेमावी, “व्होकल तेलोकल’ हे पंतप्रधानांनी जाहीर केलेलेअभियान तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापारी आणि शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश असणारी राष्ट्रीय पातळीवर संयुक्त समिती नेमावी, त्याचबरोबर राज्यपातळीवर प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हा समिती नेमावी, सरकारी योजनांची माहिती करून द्यावी. व्यापाऱ्यांना सरकारने कमी दराने कर्ज उपलब्ध करून द्यावे, जेणे करून मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करण्यास व्यापाऱ्यांना मदत होईल, आदी मागण्यांसाठी त्यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला.
कोल्हापुरात नव्याने साकारतेय मेट्रो लाईफ सिटी
विविध संस्था, चेंबर ऑफ कॉमर्स आदी स्थानिक ते जागतिक पातळीवरील विविध संस्थावर काम करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन राष्पती ट्र प्रणव मुखर्जी, राष्पती ट्र रामनाथ कोविंद आदींच्या बरोबर विविध देशांना भेटी देवून तेथील विविध परिषदांमध्ये मार्गदर्शनाची संधी ललित गांधी यांना मिळाली. आशिया, आफ्रिका, अमेरिका, युरोप या चारही खंडातील सुमारे२१ देशांना त्यांनी भेटी दिल्या आणि तेथील व्यापार, उद्योग, रिअल इस्टेट तसेच शिक्षण व्यवस्थेचा अभ्यास केला. भविष्याची गरज ओळखून आवश्यक शिक्षण कोल्हापुरातील विद्यार्थ्यांनाही मिळावे, या उद्देशाने २०१९ साली आंतरराष्ट्रीय पातळीवरील शिक्षण देण्यासाठी ललित गांधी जैन इंटरनॅशनल स्कूलची स्थापना केली आहे. कोल्हापुरातील अशा पध्दतीची ही पहिलीच शाळा ठरणार आहे. ‘सीबीएसई‘ बोर्डाशी संलग्नता असणारी ही शाळा पाचगाव-गिरगाव रोडवर निसर्गरम्य वातावरणात ३५ एकराच्या नियोजित अत्याधुनिक मेट्रो लाईफ सिटी या टाऊनशीपमध्ये असून ही टाऊनशीपही एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. कोल्हापूरला वारंवार महापूराला सामोरेजावेलागतेआहे. ललित गांधी यांच्या नाविण्यपूर्ण संकल्पनेतून व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीपासून कोणताही धोका नसणारे अशा पध्दतीचे हे सुनियोजित शहर पहिल्यांदाच कोल्हापुरात वसवलेजाणार आहे. एकूण सहाशेपंचवीस उंबऱ्यांचेहेशहर असेल. पन्नासहून अधिक अत्याधुनिक सुविधा, एसी ऑडीटोरियम, बर्डस पार्क, स्पोर्टस कॉम्प्कले्स, क्लब हाऊस, वेल डेव्हलप्ड़ गार्डन, जिम पार्क, सांडपाणी प्रक्रियेची स्वतःची स्वतंत्र व्यवस्था येथेउपलब्ध असेल. प्रकल्पांतर्गत पन्नास फूटी रस्ते, चोवीस तास पाणी, स्टरी्ट लाईट या सुविधाही येथेदेण्यात आल्या आहेत.
ललित गांधी यांची संघटनात्मक बांधणी
- महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲंड ॲग्रीकल्चर या महाराष्ट्रातील व्यापार, उद्योग आणि सेवा क्त्षेराची शिखर संस्था असलेल्या संस्थेवर गेली २१ वर्ष कार्यकारीणी सदस्य, संचालक, उपाध्यक्ष अशी विविध पदे भुषवुण सध्या वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणुन कार्यरत.
- देशातील सात कोटीहून अधिक व्यापाऱ्यांची शिखर संस्था असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या संस्थेचे राष्ट्रीय संघटन मंत्री
- वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज, ॲंग्रो ॲंड एज्के यु शनचे अध्यक
- फिक्की- फे डरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स या व्यापार व उद्योग क्त्षेरातील राष्ट्रीय शिखर संस्चे एक्झिक् थे टयुीव्ह कमिटी मेंबर
- असोचेम – दि असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स ॲंण्ड इंडस्ट्रीज इन इंडिया मॅनेजिंग कमिटी मेंबर
- ऑल इंडिया जैन मायनोरिटी फे डरेशनचे पहिले राष्ट्रीय अध्यक
- अखिल भारतीय मारवाडी युवा मंचचे २०११ ते २०१४ या काळात राष्ट्रीय अध्यक्ष, महावीर एज्केयुशन सोसायटीची १९९१ साली स्थापना व गेली ३० वर य्ष शस्वी वाटचाल
- ग्लोबल मारवाडी चॅरिटेबल फाऊं डेशनचे आंतरराष्ट्रीय अध्यक
- ‘जितो‘ मायनोरिटी सेलचे पहिले राष्ट्रीय अध्यक
- ‘जितो‘ ॲडमिनिस्ट्रेटीव्ह ट्रेनिंग फाऊं डेशनचे पेट्रन मेंबर
- कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स वर गेली ३१ वर्षापासुन संचालक, उपाध्यक्ष व अध्यक्ष अशा विविध पदावर नेत्रदिपक कार्य
- राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे गेली २६ वर नेतृत्व
- महावीर नागरी पतसंस्चे थे संस्थापक अध्यक
- महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फे डरेशनचे २००० ते २००७ या काळात अध्यक
- नॅशनल असोसिएशन ऑफ को-ऑपरेटीव्ह सोसायटीज ॲंड फे डरेशन इन इंडियाचे २००७ ते २०१७ या काळात अध्यक
- नॅशनल कमिशन फॉर मायनोरिटी एज्के यु शन इन्स्टिट्टयूशन्स (NCMEI) या आयोगावर २०१४-२०१५ या एक वर्षासाठी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, कर्नाटक या चार राज्यांसाठी विभागीय समन्वयक म्हणून काम
- भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयांतर्गत प्राणी कल्याण विषयावर विविध शिक्षण संस्थांवर भारत सरकारतर्फे प्रतिनिधीत्व.
मिळालेले प्रतिष्ठेचे पुरस्कार
-
- सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी भगवान महावीर अहिसां पुरस्कार (२०१४)
- सामाजिक योगदानाबद्दल जैन समाजरत्न पुरस्कार (२०१५)
- सहकारातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सहकारभूषण राष्ट्रीय पुरस्कार
- शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल जीवनगौरव पुरस्कार
संकट हीच खरी संधी…
वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षापासून ललित गांधी यांनी सुरू केलेला हा सारा प्रवास आता ललित गांधी ग्रुपच्या माध्यमातून अनेकांसाठी प्ऱरेणादायी ठरत आहे. मात्र, गेल्या या चाळीस वर्षांच्या प्रवासात त्यांना अनेक अडचणी आल्या. कधी कधी मोठी आर्थिक कोंडीही झाली. पण, ज्या ज्या काही नव्या गोष्टी त्यांनी केल्या. त्यामागील समाजाभिमुख उद्देश आणि त्यासाठीच्या प्रामाणिकपणाच्या जोरावर त्यांना काही संस्थांनी ,सहकार्याचा हातही दिला. एकूणच साऱ्या प्रवासात त्यांनी संकट हीच संधी मानली आणि यशाचा एकेक टप्पा पार करत तेपुढेचालत राहिले. आज यशोशिखरावर असताना मात्र तेएकूणच प्रवासात ज्यांनी ज्यांनी पाठीवर खमका हात ठेवला त्या प्रत्येकाप्रं ती कृतज्ञता व्यक्त करतात.