कुठलाही राजकीय वारसा नसताना फक्त चांगल्या विचारांच्या जोरावर राजकारणात किती मोठे होता येते, याचे प्रणादायी रे उदाहरण म्हणजे अमरीशभाई पटेल. शिरपूर नगराध्यक्षपदाद्वारे सुरू झालेली राजकीय कारकीर्द, नंतर आमदार आणि माजी शालेय शिक्षण, क्रीडा, युवक कल्याणमंत्री अशा कॅबिनेट मंत्रीपर्यंतचा त्यांचा प्रवास अखंड समाजसेवेतील पारदर्शकता, माता-पित्याचा सुसंस्कृत वारसा, बंधूची सश्रद्ध पाठराखण, जनतेचा अढळ विश्वास, कार्यकर्त्यांची मेहनत यामुळेच शक्य झाला. त्यांनी या कामामुळे शिरपूर तालुक्यातील जनतेचे जीवन मंत्रुत्न टाकले. सतत ४० वर्षे एका मतदारसंघावर पकड टिकवून ठेवणे सोपे नाही. जातीयतेचा कोणताही आधार नाही, नातेसंबंधांची कोणतीच सोय नाही, मिळाला तो वारसा दानधर्माचा, देणाऱ्या हाताचा आणि अक्षय कर्णवृत्तीचा! ही अशी पार्श्वभूमी लाभूनही अमरीशभाई पटेल हाच शिरपूर तालुक्यासाठी परवलीचा शब्द ठरला आहे. त्यांचे मोठेपण कालही शाबूत होते, आजही झळकते आहे आणि उद्याही तळपत राहील. त्यांच्या नियोजनदृष्टीतून साकारलेल्या विकासयात्रेत्त तालुक्याचा विविधांगी विकास झाला. समाजाचा प्रत्येक घटक स्वबळावर कसा उभा राहील, याचे सतत चिंतन करून त्या दिशेने सकारात्मक व यशस्वी प्रयत्न करून हा तालुका आत्मनिर्भर करण्यासाठी केलेल्या कष्टांची गाथा म्हणजे अमरीशभाईंचा आजवरचा प्रवास आहे. धुळे जिल्ह्याने बोटावर मोजण्याजोगे गौरवसूर्य अनुभवले त्यात अमरीशभाईंचे स्थान वरचे आहे. कारण त्यांचे नेतृत्व स्वयंसिद्ध आहे.
विकासाचा महामेरु : आमदार अमरीशभाई पटेल
राजकारणाबरोबरच सर्व जाती-धर्मांतील, तसेच स्तरांतील लोकांना सोबत घेऊन समाजकारण करणारे, विकासाभिमुख ध्यधोरणे राब ये वून खेड्यापाड्यांतील लोकांना उच्च दर्जाचे शिक्षण व आरोग्यसेवा पुरविणारे अमरीशभाई पटले यांनी विकासपुरुष म्हणून आपली ओळख निर्माण के ली आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूरमध् अत्ये याधुनिक सेवा-सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून गेली तीन दशके भगीरथ प्रयत्न करणाऱ्या अमरीशभाईंचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात शैक्षणिक संस्थांचे जाळे निर्माण करीत युवा पिढीला रोजगारक्षम बनविणाऱ्या या आधुनिक शिक्षणमहर्षीची कहाणी..
शिरपूरचा कायापालट
अमरीशभाई पटेल यांच्या कार्याचे महत्त्व समजून घेण्यासाठी तीन दशके मागे जावे लागेल. १९८५ चा तो काळ. शिरपूरचे नगराध्यक्ष म्हणून अमरीशभाईंची निवड झाली. त्यापुढील १२ वर्षे ते नगराध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तो काळ असा होता, की मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या शिरपूर येथे ना विकास होता, ना पाणी होते, ना वीज होती, ना सांडपाण्याचे व्यवस्थापन होते. लिकेकडेही निधीची चणचण होती. त्यामुळे विकास योजना राबवायलाही अडचणी होत्या. त्यामुळे अमरीशभाईंच्या नेतृत्वाचा कस लागला. सात किलोमीटर अंतरावर असलेल्या तापी नदीवरून शिरपूरसाठी पाणी आणण्याची योजना त्यांनी मंजूर करून आणली आणि तेवढ्यावरच न थांबता अगदी तीन-चार मजल्यांवर चांगल्या दाबाने पाणी पोहोचेल अशी व्यवस्था त्यांनी केली. पाण्याचा प्रश्न सोडविल्यानंतर अमरीशभाईंनी मोर्चा वळविला तो रस्तेबांधणी आणि वीजपुरवठ्याकडे. दर्जेदार रस्त्यांमुळे आणि सुरळीत वीजपुरवठ्यामुळे शिरपूरचा कायापालट झाला आणि विकासाच्या दिशेने वाटचाल करणारे शहर म्हणून शिरपूरची नवी ओळख निर्माण झाली.
राजकीय दरदृष्टी
दूरदृष्टी असलेला राजकीय नेता म्हणूनही अमरीशभाई यांची ओळख अधोरेखित झाली आहे. राज्यात पुणे-मुंबईसारखी प्रगत शहरे आहेत, तर दुसरीकडे अद्यापही अपेक्षित विकास न झालेला ग्रामीण भाग आहे. दरडोई उत्पन्नाचा विचार केला, तर महाराष्ट्र नवव्या क्रमांकावर येतो. मात्र हे केवळ मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर या शहरांमुळे. ग्रामीण भागाचा विचार केला, तर ते १७ व्या क्रमांकावर असेल. मग राजकीय भूमिका घेणाऱ्यांनी फक्त शहरी भागाचाच विकास करायचा, की ग्रामीण भागातही तो विकास पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावा, असा खडा सवाल अमरीशभाई करतात. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागही सुखी करायचा असेल, तर आज आपण तेथील शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधांसाठी दहा पटींनी अधिक खर्च करायला पाहिजे, असे परखड मत ते व्यक्त करतात.
ते म्हणतात, ‘‘मुंबईसारखे शिक्षण, आरोग्यसेवा शिरपूरसारख्या सर्व गावांमध्ये उपलब्ध झाल्या पाहिजेत, अशी माझी इच्छा आहे. तसे झाल्यास महाराष्ट्र सुखी आ णि समृद्ध होईल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, याकरिता प्रत्येक तालुक्यात एज्युकेशन हब तयार झाले पाहिजेत. शेतीसाठीचे पाणी, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या, तरच गावांचा विकास होईल. तसेच त्या भागांमध्ये रोजगारनिर्मिती होण्यासाठी उद्योगांना आमंत्रित केले पाहिजे. याचाच एक भाग म्हणून आता आम्ही १५ कारखाने सुरू करीत आहोत. आरोग्यसेवा देण्यासाठी ९०० बेड्सचे सुसज्ज रुग्णालय बांधत आहोत. ‘एसव्हीकेएम’ संस्थेमार्फत होणाऱ्या उपक्रमांमध्येही आमची हीच भूमिका आहे, की गरीब लोकांची लूट थांबली पाहिजे. या रुग्णालयाचे काम जोरात सुरू असून, सप्टबेंरपर्यंत ३०० बेड्सचे काम पूर्ण होईल. त्याव्यतिरिक्त नर्सिंग, आयुर्वेदिक, होमिओपॅथी महाविद्यालयाचे कामसुद्धा सुरू आहे. कृषी महाविद्यालय, टेक्स्टाईल, तसेच डेअरीसंबधिं त संस्थाही लवकरच सुरू करीत आहोत. पशुसंवर्धनाचे एक महाविद्यालय, जे सध्या बंद आहे, ते कार्यान्वित करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.’’
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सध्या विधान परिषदेत आमदार असलेले अमरीशभाई पटेल आता लवकरच वयाची ७५ वर्षे पूर्ण करीत आहेत. शिरपूरसह चार तालुक्यांचा विकास करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. शिरपूर मॉडेल लोकप्रिय आहे, कारण तेथे पालिकेचे रुग्णालयही कॉर्पोरेट रुग्णालयासारखे आहे. शहरी भागात असलेल्या मनोरंजनाच्या सर्व सुविधा म्हणजे अम्युझमेंट पार्क, मल्टिप्कले्स, लेसर शो इत्यादी शिरपूरमध्ये उपलब्ध आहेत. शिरपूरमध्ये उभ्या राहत असलेल्या नव्या रुग्णालयामध्ये तज्ज्ञ डाॅक्टर असावेत, यासाठीही अमरीशभाई विशेष लक्ष घालत आहेत. शिरपूरमध्ये पाणी मीटरची १०० टक्के अंमलबजावणी करण्यासाठीही ते प्रयत्नशील आहेत. शिरपूरचा कायापालट झाला तो बंधाऱ्यांमुळे. पाणी उपलब्ध झाल्यामुळे सव्वा लाख वृक्षरोपणाचे कामही करता आले. धुळ्यात एक लाख चौरस फुटांचे इनडोअर क्रिकेट स्टेडियमही त्यांनी उभे केले आहे.
रस्तेबांधणी
अमरीशभाई १९९० मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. सर्व भाषिक, तसेच जाती-धर्माच्या लोकांनी त्यांना भरभरून मते दिली. आदिवासी भाग असल्यामुळे रस्तेविकासाकडे दुर्लक्ष झालेले होते. अमरीशभाईंनी १९९० ते ९५ या पाच वर्षांच्या कालावधीतच ३५० कोटी रुपये एवढ्या मोठ्या रकमेची रस्ते विकासाची कामे राज्य सरकारकडून मंजूर करून घेतली. त्याचा परिणाम असा झाला, की शिरपूर मतदारसंघात ४०० पुलांची कामे झाली. दळणवळण वाढले. तालुक्याची भरभराट होण्यास सुरुवात झाली. कारण आता कितीही मोठा पाऊस झाला, तरी वाहनांची ये-जा थांबत नव्हती. याचा पुढचा टप्पा म्हणून तालुक्यात रस्तेबांधणीचे काम त्यांनी हाती घेतले. २००४ पर्यंत त्यांनी तालुक्यात ९०० किलोमीटर लांबीचे रस्तेबांधून पूर्ण केले.
आदिवासी कल्याणासाठी कार्यरत
आदिवासी लोकसंख्येचे अन्य प्रश्नही अमरीशभाईंनी मार्गी लावले. आदिवासींच्या ज्या जमिनींवर २००५ पूर्वी अतिक्रमण झालेले होते, अशा सर्व जमिनी मूळ मालक असणाऱ्या आदिवासींच्या नावावर करण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले. तब्बल ६० हजार एकर जमीन एकूण १२ हजार आदिवासी लोकांच्या नावावर करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या जीवनात परिवर्तन आले. आदिवासींसाठी पाच आश्रमशाळाही सुरू केल्या. त्यामध्ये दोन हजार विद्यार्थी शिकत आहेत. पैकी १०० हून अधिक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनीअर म्हणून विविध ठिकाणी कार्यरत आहेत. हे परिवर्तन घडवून आणताना समाजासाठी काहीतरी भरीव सकारात्मक काम करता आले याचे समाधान वाटते, तळागाळातील गरजू-गरीब लोकांच्या विकासासाठी निधी खर्च झाला, ही मोठी विधायक आणि समाधानाची गोष्ट असल्याचे अमरीशभाई सांगतात. या सर्वसमावेशक आणि विकासाभिमुख कार्यामुळेच ते आमदार म्हणून सलग चार वेळा निवडून आले.
वैशिष्ट्यपूर्ण संपर्क कार्यालय
आमदाराचे संपर्क कार्यालय कसे असावे, याचा आदर्श अमरीशभाई पटेल यांनी निर्माण केला आहे. बारा महिने, चोवीस तास सुरू असलेल्या त्यांच्या संपर्क कार्यालयात तब्बल ५० कर्मचारी काम करतात. त्यांच्या मतदारसंघातील २८ पंचायत समित्यांबरोबर त्यांचा समन्वय सुरू असतो. मतदारसंघातील कोणाचेही काम असले, तरीही अमरीशभाईंच्या कार्यालयातील कर्मचारी अर्ज भरतात व पाठपुरावा करतात. केवळ कार्यालयामार्फतच नाही, तर अन्य लोकोपयोगी उपक्रमांद्वारेही अमरीशभाईंनी लोकांची सेवा केली आहे. आतापर्यंत सुमारे ३२ हजार नागरिकांच्या डोळ्यांचे उपचार व शस्त्रक्रिया त्यांनी मोफत करून दिल्या आहेत. तसेच ‘संजय गांधी निराधार योजने’मार्फत त्यांनी ३४ हजार लोकांना लाभ मिळवून दिला आहे. शिवाय १४ हजार कामगारांनाही त्यांनी मदत केली आहे. कोविड-१९ महामारीच्या काळात त्यांनी मतदारसंघामध्ये १५ हजार रेमडेसिविर इंजेक्शन्सचा पुरवठा केला होता. ज्या वेळी ते अन्यत्र ३० ते ३५ हजार रुपयांना विकले जात होते, त्या वेळी अमरीशभाई यांच्यामतदारसंघात तेच केवळ ७५० रुपयांना नागरिकांना मिळत होते.
जलसंधारणाच्या शिरपूर पॅटर्नचा राष्ट्टीय पातळीवर गवगवा
शिरपूरमध्ये पायाभूत सुविधांचा विकास केल्यानंतर शेतकऱ्यांना, त्यांच्या पिकाला शाश्वत पाणीपुरवठा कसा निर्माण करता येईल, याचा विचार अमरीशभाईंनी सुरू केला. त्यातून उभी राहिली ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ तत्त्वावरील ‘जलयुक्त शिवार’ची मोहीम. अमरीशभाई व भूपेशभाई पटेल यांच्या पुढाकाराने तब्बल ३५० बंधारेबांधण्याच्या कामास सुरुवात झाली आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून आला. शासनाच्या निविदा प्रक्रियेपासून भांडवलनिधी उभारणीपर्यंत सर्व पैलूंचा अभ्यास अमरीशभाई यांनी केला आणि ही मोहीम यशस्वी केली. अमरीशभाईंच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या मोहिमेमुळे कोरडवाहू जमीन म्हणून ओळख असलेले एक लाख एकर क्षेत्र सिंचनाखाली आले. देशासह महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाचे व्यापक काम करणारे राजकारणी अपवादात्मकच आढळतील. या कामाची पोचपावती म्हणूनच ही यशस्वी मोहीम सर्वत्र ‘जलसंधारणाचा शिरपूर पॅटर्न’ म्हणून ओळखली जाऊ लागली. या कामांना शासनाकडून, तसेच ‘श्री विलेपार्ले केळवणी मंडळा’मार्फत देखील आर्थिक योगदान देण्यात आले आहे.
‘जलयुक्त शिवार’च्या या मोहिमेअंतर्गत तब्बल ५० ते १०० कोटी लिटर पाणी ठिकठिकाणी अडविण्यात आणि जिरविण्यात यश आले. शिरपूर व परिसरातील जमिनीखालील पाण्याची पातळी वाढली. शेतकरी वर्षातून तीन पिके घेऊ लागलेव त्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढले. तालुक्यातील ४० टक्के आदिवासी लोकसंख्येला यामुळे मोठा लाभ झाला
विकासाची दूरदृष्टी असणारे नेतृत्व म्हणून आमदार अमरीशभाई पटेल यांच्याकडे पाहिलेजाते. राज्य शासनानेयापुढे मोठी धरणे न बांधता ग्रामपातळीवर व तालुका स्तरावर छोट्याबंधाऱ्यांवर भर द्यावा, ही त्यांची भूमिका आहे. आज अनेक ठिकाणी ‘शिरपूर पॅटर्न’ने व्यापक रूप धारण केले आहे. संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी ‘शिरपूर पॅटर्न’ हा महत्त्वपूर्ण पर्याय ठरला आहे. पाण्याचे सर्व स्रोत जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करणे ‘शिरपूर पॅटर्न’मुळेशक्य होते.
गरजू व गोरगरीब शेतकरी बांधवांना अमरीशभाईंच्या मुंबई येथील मित्रपरिवारानेव जुहू जागृती मंडळ यांच्यावतीनेडिझेल इंजिन मोफत पुरविण्यात आली. आता शिवार रस्ते तयार करून देण्याचे काम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आले आहे. ‘शिरपूर पॅटर्न’च्या कामांचे अनेक फायदेशेतकरी बांधवांनी अनुभवले आहेत. अनेक शेतकरी बांधवांच्या बांधापर्यंत किंवा शेतापर्यंत रस्ते, तसेच नाल्यांच्याबाजूने अतिशय चांगल्या दर्जाचे रस्तेबांधण्यात आले आहेत. शिवाय नाल्यांच्या खोलीकरणामुळेव रुंदीकरणामुळे तेथील माती शेतांमध्ये टाकल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती सुपीक झाली.
आता त्यांनी पंचायत पातळीवर आरोग्यसेवा देण्यासाठी पावले उचलली असून, शिरपूर तालुक्यामध्ये अशी रचना ते लावत आहेत. आरोग्यसेवेबाबतच्या ‘शिरपूर पॅटर्न २.०’ची अनुभूती लवकरच सर्वांना येईल, असे अमरीशभाई सांगतात.
शिक्षण संस्थेची स्थापना
गुणवत्तापूर्णशिक्षणासाठीच्या दर्जेदार सुविधांअभावी छोटी शहरे मागे पडतात, हे लक्षात घेऊन अमरीशभाई पटेल यांनी ‘शिरपूर एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना केली. यामागील भूमिका स्पष्ट करताना ते म्हणतात, की चांगल्या शिक्षणाच्या अभावामुळे ग्रामीण भागाचा विकास होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. काही अपवाद वगळता बऱ्याच शिक्षण संस्था या पुढाऱ्यांनी आपल्या स्वार्थासाठी सुरू केल्या. त्या संस्थांवर राजकारण्यांचे नियंत्रण होते आणि त्यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावला. त्यामुळे दोन पिढ्यांचे नुकसान झाले. ही गोष्ट लक्षात घेऊन ‘शिरपूर एज्युकेशन सोसायटी’ सुरू केली आणि शिक्षणाचा दर्जा कसा राखता येईल, राजकीय हस्तक्षेप होणार नाही, हे आजतागायत कटाक्षाने सांभाळले. परिणामी ७२ हजार लोकसंख्या असलेल्या शिरपूर गावातील ३७ हजार म्हणजे जवळपास सर्व तरुण-तरुणी शिकल्या. देशातील मोजक्या शहरांमध्ये असे प्रमाण तुम्हाला आढळेल. शिरपूरमध्येशिकलेल्या ७ ते ८ हजार मुला-मुलींना पुण्या-मुंबईत नोकरी मिळाली, तर १२ ते १५ हजार तरुण-तरुणींना परदेशात नोकरी मिळाली. शिक्षणामुळे मिळालेला रोजगार आणि त्यातून आलेले आर्थिक स्थैर्य यामुळे साहजिकच त्या कुटुंबीयांचे जीवनमान, तसेच सामाजिक-आर्थिक स्तर उंचावला, ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. हे घडू शकले ते केवळ राजकारणविरहित दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे.
‘एसव्हीकेएम’ संस्थेचा देशभरात विस्तार
अमरीशभाईंच्या आयुष्यात २००२ मध्ये एक दुखःद घटना घडली. त्यांचे ज्येष्ठ बंधू मुकेशभाई यांचे निधन झाले. व्यक्तिगत जीवनातील या हानीमुळे खचून न जाता अमरीशभाई यांनी सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतले. मुकेशभाई यांच्या निधनानंतर अमरीशभाई यांनी ‘श्री विलेपार्ले केळवणी मंडळ’ (एसव्हीकेएम) या संस्थेची धुरा सांभाळली. जोपर्यंत शिक्षणव्यवस्था सुधारत नाही, तोपर्यंत आपल्या देशाचा विकास खऱ्या अर्थाने होणार नाही, असे अमरीशभाई यांचे ठाम मत आहे. आजच्या घडीला भारताची लोकसंख्या १४० कोटी आहे, तर येत्या काही वर्षांतच ती १६४ कोटीवर पोहोचेल. एवढ्या मोठ्या लोकसंख्येमध्ये तरुण मुला-मुलींची संख्याही लक्षणीय आहे. त्यांच्या गुणात्मक शिक्षणाकडे आपण लक्ष दिले नाही, तर आज आपल्याला जी जमेची बाजू वाटत आहे, तीच गोष्ट विध्वंसक ठरू शकेल. या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन, अमरीशभाई यांनी शिक्षणाची गुणवत्ता, दर्जा राखून मुला-मुलींना शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला. यासाठी केवळ सरकारवर अवलंबून राहणे त्यांना मान्य नाही.
आमची संस्था म्हणजे कुटुंबच
अमरीशभाई सांगतात, ‘‘एसव्हीकेएम संस्थेची धुरा हाती घेतली, तेव्हा तेथे १५ ते २० हजार विद्यार्थी शिकत होते. आज ही विद्यार्थिसंख्या ६० हजार आहे. आमचे स्वप्न आहे, की ही संख्या एक लाखापर्यंत लवकरच पोहोचावी. मला विद्यार्थ्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणायचे आहे. हा सर्व भार पेलत असताना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्याही आयुष्याचा, करिअरचा व त्यांच्या कुटुंबीयांचा आम्ही विचार करतो. विविध विभागांचे संचालक असोत की शिक्षक की कर्मचारी, ते सर्वजण या संस्थेकडे त्यांचे कुटुंब म्हणूनच पाहतात. त्यामुळेच त्यांचे पगार वेळेवर करण्यापासून सर्व प्रकारची काळजी आम्ही घेतो.’’
कँपस प्लेसमेंट आणि भरीव पॅकेज
जागतिक स्तरावरचे शिक्षण ‘एसव्हीकेएम’ संस्थेच्या विद्यापीठांमध्ये, महाविद्यालये आणि शाळांमध्ये मिळेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. दरवर्षी २० हजार विद्यार्थी या संस्थांमधून उत्तीर्ण होतात आणि त्या सर्वांना देशात, तसेच परदेशात मोठ्या पगाराच्या नोकऱ्याही सहजपणे उपलब्ध होतात, हे ‘एसव्हीकेएम’चे यश आहे. मुंबईतील अन्य विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत ‘एसव्हीकेएम’च्या विद्यार्थ्यांना दोन ते ६५ लाख रुपये पगाराच्या नोकऱ्या कँपस प्लेसमेंटच्या माध्यमातून मिळतात, असे अमरीशभाई अभिमानाने सांगतात. ‘एसव्हीकेएम’चा विस्तारही अमरीशभाईंनी देशभरात केला आहे. बंेगळुरु, हैदराबाद, नवी मुंबई, धुळे, शिरपूर, इंदूर, चंडीगढ येथे शिक्षण संस्था कार्यरत आहेत. तर अहमदाबाद येथे नवे शैक्षणिक दालन सुरू केले आहे. नोएडा येथेही जागा घेण्यात आली असून, तेथे संस्थेचे काम सुरू होणार आहे.
संस्थेच्या महाविद्यालयांमधून शिकलेले ८० हजार विद्यार्थी परदेशात नोकरी करतात व त्यामुळे त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आयुष्यच बदलून गेले आहे. एम.बी.ए.चे शिक्षण देणाऱ्या त्यांच्या महाविद्यालयाचा क्रमांक जगामध्ये सहावा आहे, ही गोष्ट अमरीशभाई अभिमानाने सांगतात.
देशात आणि परदेशात नावलौकिक मिळविणाऱ्या या संस्थेकडून सामाजिक जाणीव कशी जपली जाते, याचीही माहिती अमरीशभाई यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘आदिवासी लोकसंख्या असलेल्या माझ्या मतदारसंघातील विद्यार्थी आणि मुंबईसारख्या शहरातील विद्यार्थी यांना शिक्षणाची समान संधी मिळाली पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. ते साध्य करण्यासाठी आम्ही ४५ आदिवासी विद्यार्थ्यांना, त्यांच्या परीक्षेतील गुणांच्या आधारावर प्रशिक्षणासाठी निवडतो. या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या ‘जेईई’ आणि ‘नीट’ या प्रवेश परीक्षांच्या तयारीसंदर्भात प्रशिक्षण दिले जाते. या उपक्रमासाठी सुमारे ३.५ कोटी रुपये दरवर्षी खर्च केले जातात. त्या मुलांची राहण्याची व्यवस्था, खाणेपिणे, कपडे इत्यादी सर्व खर्च संस्थेतर्फे केला जातो. विशेष म्हणजे, शहरातील विद्यार्थ्यांसोबत त्यांचेही प्रशिक्षण घेतले जाते, त्यामुळे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचाही आत्मविश्वास वाढतो.
संस्थांची माहिती आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण
मुंबई येथील ‘एसव्हीकेएम’ संस्था, तसेच ‘एनएमआयएमएस’ अभिमत विद्यापीठामार्फत हजारो विद्यार्थी दर्जेदार व गुणवत्तापूर्णशिक्षण घेऊन बाहेर पडून संपूर्ण देशात व जगभरात चांगल्या हुद्द्यांवर कार्यरत आहेत
संस्थेने मुंबई, नवी मुंबई, शिरपूर, धुळे, हैदराबाद, चंडीगढ, बेंगळुरु, इंदूर, अहमदाबाद येथे भव्य शैक्षणिक कॅम्पस निर्माण केले आहेत. या सर्वठिकाणी मिळून एक लाख विद्यार्थी दर्जेदार व गुणवत्तापूर्णशिक्षण घेत आहेत
शिरपूर एज्युकेशन सोसायटी, आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट या संस्थांच्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून शिरपूर तालुक्यात शिक्षणाचे मोठे जाळे विणले. इंजिनीअरिंग, फार्मसी, मॅनेजमेंट, विज्ञान, कला आणि वाणिज्य, बीसीए, बीबीए, बीबीएम, एमसीए, एमबीए, एमबीएम, एमएड, बीएड यांसह वरिष्ठ महाविद्यालये आणि डी. एड. कॉलेज आणि प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळा म्हणजे KG ते PG पर्यंतच्या अनेक सीबीएसई शाळा सुरू केल्या असून, यात ३५ हजार विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत आहेत