ब्रँड ‘सह्याद्री फार्म्स’वर ‘४२ देशांची पसंतीची मोहोर

‘सीड टू प्लेट’ म्हणजे पीक लागवडीपासून ते ग्राहकाच्या ताटापर्यंत अन्न पोहचवताना स्वतःची मूल्यसाखळी विकसित करणारी सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. ही १०० टक्के शेतकऱ्यांच्या मालकीची भारतातील अग्रगण्य शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून ओळखली जाते . सुमार २०० हून अधिक गावातील सभासद सदस्य तसेच जोडलेले इतर शेतकरी असे एकत्रित ११ हजाराहून अधिक शेतकरी व या सर्वांचेमिळून २५ हजार एकराहून अधिक शेतीक्षेत्र असा कंपनीचा विस्तार आहे. रिटेल बाजारपेठेत कस्टमर डिलाइट (ग्राहकाचा आनद)’ केंद्रस्थानी असल्याने त्यांना ‘व्हॅल्यु फॉर मनी’ देताना दर्जामध्ये तडजोड करायची नाही, ही सह्याद्र फार्म्सची ठाम विचारधारा आहे.

‘सह्याद्री फार्म्स’ ब्रँडचा शेतमाल आजवर जगभरातील ४२हून अधिक देशांनी स्वीकारला आहे. युरोप आणि जपान या अन्नसुरक्षेच्या अत्यंत कठीण चाचण्या असलेल्या बाजारपेठा व सुपरमार्केट्समध्ये गेल्या ११ वर्षांत हा ब्रँड प्रस्थापित झाला. सह्याद्री फार्म्स ब्रँडची फळे, भाज्या व अन्य प्रक्रियायुक्त उत्पादने आता भारतीय बाजारपेठेत पहिल्या टप्प्यात नाशिक, मुंबई आणि पुणे या तीन शहरांतील कंपनीचे स्टोअर्स आणि ई-कॉमर्सच्या (ऑनलाइन) माध्यमातून ग्राहकांसाठी उपलब्ध झाली आहेत. ३ लाख ‘व्हॅल्यूड कस्टमर्स’ जोडणे तसेच शेतमाल पुरवठा करणाऱ्या सध्याच्या ११ हजारांहून अधिक शेतकऱ्यांची संख्या २५ हजारांवर नेणे, हे पहिले लक्ष्य आहे. करोना लॉकडाऊनच्या कठीण काळात सह्याद्री फार्म्सने मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये १ लाखांहून अधिक ग्राहकांपर्यंत दर्जेदार व निरोगी फळं आणि भाजीपाल्याच्या ६ लाखांहून अधिक बास्केट्स सुरक्षितपणे पोहोचवून स्वतःला सिद्ध केले.

सह्याद्री फार्म्सच्या स्थापनेमागे शेतकऱ्यांचेहित, ग्राहकांना सुरक्षित व आरोग्यदायी उत्पादनांचा पुरवठा याबरोबरच ग्रामीण व शहरी समाजातील दरी कमी करणे, ही मुख्य उदिष्ट्ये आहेत. शेतकऱ्यांना उत्पादनाचा रास्त भाव तसेच ग्राहकाला सुरक्षित व आरोग्यदायी अन्न हा समतोल राखण्यासाठी कंपनीचा आजवरचा प्रवास अत्यंत यशस्वी आहे.

द फार्म स्टोअर :

उत्पादकाच्याहाती बाजारपेठ असेल तरच त्यांना योग्य व शाश्‍वत नफा मिळतो आणि ग्राहकाना ही थेट लाभ होतो. ‘उत्पादक ते ग्राहक’ हा दुवा जोडण्यासाठी सह्याद्री फार्म्सन पेणु, मुबई आणि नाशिक शहरामध्ये आजवर ‘द फार्म स्टोअर’ नावाने स्वतःचे १३ स्टोअर्स सुरू कले आहेत. शिवाय या शहरातील ग्राहक sahyadrifarms.store/ या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून देखील खरेदी करू शकतात. वेब पोर्टल आणि सह्याद्री फार्म्सन वेिकसित कलेल्या ‘ॲप’च्या माध्यमातून सध्या सुमारे सव्वा लाख ग्राहक सुलभपण खरेदी करीत आहेत. गुगल ‘प्ले स्टोअर्स ’वरुन हे ॲप डाउनलोड करता येऊ शकत.

विस्ताराची नवी माध्यमे :

सह्याद्री फार्म्सने साडेतीन वर्षांपूर्वीच स्वतःची ‘एफएमसीजी’ उत्पादने बाजारात आणली. नाशिक, जळगाव, पुणे, मुबई येथील सुमारे १० हजार रिटेल ओउटलेट्समध्ये फूडसड्रीकसं, ज्युसस, जॅम, केचअप, फ्रोजन आणि आयक्युएफ प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. सह्याद्री फार्म्सची ‘असेपे्टीक पकॅजिंग’ उत्पादनेही बाजारात उपलब्ध आहेत. फ्रोजन फ्रूट्स आणि भाजीपाल्यासाठी हॉटल,रेस्टोरंट आंणि केटरिंगसाठी सह्याद्री फार्म्सने HORECA डिस्ट्रीब्युटर्स नेमले आहेत

‘बी-टू-सी’ आणि ‘ बी-टू-बी’:

कंपनीने ‘बी-टू-सी’ ( बिझनेस टू कंझ्युमर) आणि ‘ बी-टू-बी’ (बिझनस टू बिझनेस) मार्टिंकेग विकसित केले आहे. थेट ग्राहकांशिवाय फळ विकणारे किरकोळ आणि घाऊक खरेदीदार खरदी करू शकतात. Sahyadriyan ‘ॲप’ च्या माध्यमातून बुकींग केल्यावर महाराष्ट्र, मध्येप्रदेश आणि गुजरात या राज्यांमधील सह्याद्री फार्म्सच्या ४९ वितरण केंद्रांतून परवठा केला जातो. सध्या रोज ५० टनाहून अधिक फळे पुरवली जातात. हे प्रमाण दरदिवशी ५०० टन नेण्याचे उेद्दिष्ट आहे. हे घाऊक मार्केट दिल्लीसह देशातील अन्य राज्यांमध्येही विस्तारणार आहे.

फार्मर फॅसिलिटी सेंटर :

शेतकरी सभासदांना दर्जेदार अ‍ॅग्री इनपूट्स म्हणजे बियाणे, खते, कृषी औषधे, अवजारे आदी शेतीपूरक कृषी निविष्ठा रास्त दरात मिळण्यासाठी २०१५ साली सह्याद्री फार्म्सच्या आवारात एकाच छताखाली ३० हजार चौरस फुटांचे भव्य ‘फार्मर फॅसिलिटी सेंटर’ सुरू झाले आहे. देश-विदेशातील सर्व प्रमुख कंपन्यांची उत्पादनेया सेंटरमध्ये उपलब्ध आहेत. द्राक्ष नर्सरी, माती-पाणी परीक्षण लॅब या सुविधा एकाच ठिकाणी आहेत. शेतकरी आणि परिसरातील अन्य ग्राहकांसाठी दैनंदिन जीवनावश्यक वस्तू व सेवांचा (रिटेल) मॉल सुरू करण्यात आला आहे.

सह्याद्री फार्म्स : शेतीची परिपूर्ण विकसित साखळी

‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा!’ असं आपल्या महाराष्ट्राचं काव्यात्मक वर्णन केलं जातं. त्याचं मूळ सह्याद्री पर्वत आणि त्यामुळेनिर्माण झालेल्या भौगोलिक परिस्थितीमध्ये आहे. महाराष्ट्राचा गौरवशाली ‘शिवइतिहास’ सतराव्या शतकात सह्याद्रीच्या साक्षीने घडला! याच सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांतील चिवट छोटे शेतकरी एकविसाव्या शतकात नवा इतिहास घडवीत आहेत. ‘सीड टू प्लेट’ अशी शेतकऱ्यांची स्वतःची परिपूर्ण साखळी विकसित करण्यात कंपनी यशस्वी ठरली आहे.

सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. या शेतकरी उत्पादक कंपनी लि. ची (SFPCL) स्थापना नाशिक जिल्ह्यात २०१० मध्ये झाली. जगात कुठल्याही कंपनीचा विस्तार होताना आधी देशांतर्गत बाजारपेठेत उत्पादने विकली जातात. मग जागतिक बाजारपेठेत स्थान मिळते. सुरवातीला द्राक्ष पिकाची मूल्यसाखळी उभी केल्यावर सह्याद्री फार्म्सनेयुरोपसारख्या अन्नसुरक्षा आणि ग्राहकहिताला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या बाजारपेठेत द्राक्षांची निर्यात सुरू केली. ४२ देशांच्या बाजारपेठेतील ग्राहकांनी सह्याद्री फार्म्स ब्रँडवर विश्वास दाखवला. हा ब्रँड महाराष्ट्राचा आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. परदेशी बाजारपेठेत पुरविल्या जाणाऱ्या दर्जाची कृषी उत्पादने व पारदर्शक व्यवहारासह कंपनी भारतीय बाजारपेठेत उतरली आहे. सध्या कंपनीची सुमारे ५० टक्के कृषी उत्पादने परदेशी आणि ५० टक्के भारतीय बाजारपेठेत विकली जातात. सह्याद्री फार्म्सचे नाशिकमधील सुमारे १०० एकरवरील मुख्यालय आणि तिथे विकसित करण्यात आलेली मानवी स्पर्शविरहित हाताळणी, प्रोसेसिंग, पॅकेजिंग यंत्रणा बघितल्यावर युरोप, अमेरिका किंवा इस्त्रायलसारखे आपल्या देशात घडू शकते, यावर विश्‍वास बसतो.

टीम सह्याद्र

वाढता उत्पादनखर्च, बाजारभाव, आर्थिक फसवणूक, पिकांमधील नवीन वाणं, हवामानाच्या समस्या आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी किमान उत्पन्न आदी प्रश्‍नांचा गराडा शेतकऱ्यांभोवती आहे. आपल्या सभासद शेतकऱ्याला वर्षाकाठी खर्च वजा जाता किमान ३ ते ४ लाख रुपयेमिळवून देण्याचे लक्ष्य सह्याद्री फार्म्सने जवळपास गाठले आहे. विशेष म्हणजे सह्याद्री फार्म्स क्लस्टरमध्ये सुमारे ६ हजार जणांना थेट रोजगार मिळाला आहे.

सह्याद्री फार्म्सच्या त्रिस्तरीय रचनेत पहिल्या स्तरावर शेतकरी असून उत्पादन, उत्पादकता आणि दर्जाहे घटक यात आहेत. सभासद शेतकऱ्यांना लागवडीपासून माल तयार होईपर्यंत संपूर्ण सपोर्ट मिळतो. दुसरा स्तर पीकनिहाय शेतकरी उत्पादक कंपन्यांचा आहे. मुख्य कंपनीच्या छत्राखाली द्राक्ष, टोमॅटो, केळी, भाजीपाला, डाळिंब, पेरू, फुलं, कांदा, तांदूळ, कापूस, इतर फळेयांच्या पीकनिहाय उपकंपन्या स्थापन झाल्या आहेत. सभासद शेतकऱ्यांना तांत्रिक/तंत्रज्ञान देतानाच शेतमालाचे एकत्रीकरण, प्रतवारी, निवड आणि पॅकेजिंग, वित्तपुरवठा व विम्यासाठी मदत केली जाते. तिसऱ्या स्तरावर सह्याद्री फार्म्स मुख्य भूमिका बजावते. त्यात सह्याद्री फार्म्सशी संलग्न शेतकरी उत्पादक कंपन्यांना काढणीपश्‍चात व्यवस्थापनासाठी पायाभूत सुविधा, वितरण आणि मार्केटिंग, व इतर आनुषंगिक विषयांसाठी मार्गदर्शन केले जाते. सह्याद्री फार्म्सची द्राक्षनिर्यात गेल्या वर्षी २१ हजार टनांवर पोहोचली. देशातील एकूण निर्यातीपैकी १७ टक्के वाटा असलेली ही कंपनी क्षनिर्यातीमध्ये भारतात प्रथम स्थानावर आहे. सह्याद्री फार्म्स टोमॅटो उत्पादन, खरेदी आणि प्रक्रिया करणारी देशातील सर्वांत मोठी कंपनी आहे. वर्षाकाठी साधारणतः ८० हजार मेट्रीक टन टोमॅटो सह्याद्री फार्म्सकडून खरेदी केला जातो. हिंदुस्थान युनिलिव्हर या बहुराष्ट्रीय कंपनीच्या ‘किसान टोमॅटो केचअप’ आणि ‘फ्रूट जॅम’चे भारतातील सुमारे ५० टक्के उत्पादन सह्याद्री फार्म्सकडून केले जाते. कॅलिफोर्नियातील जगप्रसिद्ध ग्रापा व्हरायटीज आणि युरोपातील एस.एन. एफ.एल. (शिहोन ग्रेप्स) यांच्याशी भागीदारी करीत सह्याद्री फार्म्सने द्राक्षाच्या पेटंटेड ११ आरा व्हरायटी आणि शिहोन ग्रेप्सच्या ५ व्हरायटी भारतात आणल्या आहेत. या व्हरायटींचे भारतातील सर्वाधिकार सह्याद्री फार्म्सकडे आहेत. सह्याद्री फार्म्सची उपकंपनी सह्याद्री सेन्सर्टिकने शेतकऱ्यांना परवडणारी तीन प्रकारची स्वयंचलित हवामान केंद्र (वेदर स्टेशन) विकसित केली आहेत. माती, पाणी, पीक व्यवस्थापन व पीकविमा यांच्या अनुषंगाने हवामानाच्या विविध निकषांचा डाटा प्लॉटनिहाय उपलब्ध होऊन शेती अधिक काटेकोर, अचूक करण्यास त्यामुळे मदत मिळणार आहे.

स्कील व क्लस्टर डेव्हलपमेंट

सामाजिक उपक्रम म्हणून टाटा स्ट्राईव्ह व सह्याद्री फार्म्सने ग्रामीण तरुणांसाठी ‘स्कील डेव्हलपमेंट अकॅडमी’ सुरू केली असून अल्प फीमध्येप्रशिक्षण व त्यानंतर नोकरीची पात्रता व संधी उपलब्ध करून देण्यात येते. या अकॅडमीत २०२० अखेर २५ बॅचेसमधून ६८६ जणांनी यशस्वीरीत्या कोर्स पूर्ण केला. जवळपास सर्वांना सह्याद्री फार्म्स किंवा अन्य ठिकाणी चांगल्या नोकऱ्या मिळाल्या आहेत. मोहाडी व परिसरातील १४ गावांचा समूह तयार करण्यात आला असून लोकसहभाग व सह्याद्रीच्या माध्यमातून गावांचा शाश्‍वत विकास करण्यासाठी डॉ. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतील गावे घडविण्याचा ध्यास सह्याद्रीने घेतला आहे. त्यासाठी पुण्यातील ‘सत्त्व’ फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत दळवी (निवृत्त ‘आयएएस’) यांच्या मार्गदर्शनाखाली कामे सुरू आहेत.

सह्याद्री फार्म्सची कृषी उत्पादने

फळे, भाजीपाला, फुले, धान्य

द्राक्षे, डाळिंब, केळी, आंबा, स्ट्रॉबेरी, संत्रा, मोसंबी, पेरू, पपई, कलिंगड, खरबूज, चिकु

अन्य मोसमी फळे : ट्रॉपिकल फ्रूट्स पालेभाज्या फळभाज्या वेलवर्गीय भाज्या परदेशी (एक्झॉटिक) भाज्या कंदवर्गीय भाज्या मोड असलेल्या भाज्या फुले : शेवंती,
कार्नेशन, लिलियम

धान्य, डाळी, मसाल

सर्वप्रकारची धान्ये, कडधान्य, डाळी उत्तमोत्तम तांदूळ मसाले

प्रोसेस्ड आणि पॅकेज्ड फूड

फ्रूट ड्रिंक्

आंबा आंबा पन्हे पेरू डाळिंब ज्यूस जांभूळ फ्यूजन

जॅम आणि केचअप

: मँगो जॅम स्ट्रॉबेरी जॅम मिक्सफ्रूट जॅम टोमॅटो केचअप, सूप टोमॅटो प्युरी

फ्रोझन आणि इन्संट क्विक फ्रिझींग (IQF)

फ्रोजन फ्रूट पल्प आयक्यूएफ फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स

४२हून अधिक देशांत निर्यात

जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड, नेदरलँड्स, बेल्जियम, रशिया, अमेरिका, कॅनडा, पोर्तुगाल, सिंगापूर, चीन, जपान, सौदी अरेबिया, इराण, मलेशिया, इजिप्त आदी ४२ हून अधिक देशांमध्ये सह्याद्री फार्म्सची ताजी फळे, भाजीपाला आणि प्रक्रियायुक्त उत्पादनेनिर्यात केली जातात. जगातील सुमारे ५० हून अधिक प्रसिद्ध सुपरमार्केट्समध्ये सह्याद्री फार्म्स ब्रँडचा शेतमाल उपलब्ध आहे. याशिवाय एडेका सुपरमार्केट, एलआयडील, कॉफलँड, सॅनलुकार (जर्मनी), डेलमाँटे, डोल अ‍ॅग्रिकल्चर (अमेरिका), जुपिटर (युरोप), कूप (इटली), स्पिन्नीज (संयुक्त अरब अमिराती), वेटरोज दुबई. भारतात मदर्स डेअरी, हायपरसिटी, रिलायन्स फ्रेश, स्टार बझार, बिग बास्केट, चितळे बंधू आदी अनेक प्रख्यात उत्पादन समूह सह्याद्री फार्म्सचे ग्राहक आहेत.

शुद्धतेची सर्टिफिकेशन्स

सह्याद्री फार्म्सची उत्पादने सुरक्षित आहे, हे केवळ तोंडी सांगण्यासाठी किंवा जाहिरातीपुरते नाही. शुद्ध व सुरक्षित अन्न/शेतमाल प्रमाणित करणाऱ्या संस्थांची या उत्पादनांना मान्यता आवश्यक असते. सह्याद्री फार्म्सची उत्पादने भारत आणि जगभरातील सर्टिफिकेशन्स एजन्सीजच्या चाचण्यांवर खरी उतरल्यावरच ग्राहकांपर्यंत पोहोचतात. एफ.डी.ए. (अमेरिका), ग्लोबल गॅप (जर्मनी, अमेरिका), फेअरट्रेड, टेस्को, एफ.एस.एस.ए.आय., अपेडा, एसजीएफ, हलाल, अ‍ॅगमार्क या प्रमुख सर्टिफिकेशन एजन्सीजनी सह्याद्री फार्म्सच्या उत्पादनांवर शुद्धतेची मोहोर उमटवली आहे.

सह्याद्री फार्म्स आणि ‘ब्लॉकचेन’

सह्याद्री फार्म्सच्या अन्न पुरवठा ते संपूर्ण कामकाजात पारदर्शकता असून संपूर्ण माहिती ब्लॉकचेन बॅक प्लॅटफॉर्मवर ठेवली आहे. सह्याद्री फार्म्सने उत्पादित केलेला शेतमाल खाण्यासाठी १०० टक्के सुरक्षित असून तो ग्राहकांपर्यंत मानवी स्पर्शविरहित पोहोचवला जातो. भाज्या व फळे कोणत्या शेतकऱ्याच्या आहेत हे ग्राहक ‘क्विक रिस्पॉन्स कोड’ -QR code द्वारे जाणून घेऊ शकतो. फळे-भाज्यांसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा सर्वप्रथम अवलंब करणारी सह्याद्री फार्म्सही पहिलीच शेतकरी कंपनी आहे. ग्राहकानेदिलेल्या पैशाचा किती भाग सभासद शेतकऱ्याला मिळाला हे QR code स्कॅन करून पाहता येते. इच्छाशक्ती आणि पारदर्शकतेचे हे जगापुढे मांडलेले सुंदर उदाहरण आहे. हे तंत्रज्ञान फक्त फळे-भाज्यांपर्यंत मर्यादित न ठेवता पुढे सर्व प्रकारच्या मूल्यसाखळीत वापरण्यात येणार आहे. सह्याद्री फार्म्सचे चेअरमन विलास शिंदे सांगतात, “महाराष्ट्रात सुमारे एक कोटी ३६ लाख शेतकरी कुटुंबे आहेत. राज्यातील पीकपद्धती पाहता, राज्यात १३ ते १४ हजार शेतकरी उत्पादक कंपन्या असणे गरजेचे आहे, ज्यामध्येप्रत्येकी सुमारेहजार शेतकरी असतील. एका भागात समान उद्देशाने कार्यरत असलेल्या कंपन्यांची मिळून एक पीकनिहाय मूल्यसाखळी तयार होऊ शकते, ज्यात जवळपास २० हजार शेतकरी असतील. महाराष्ट्रात पीकनिहाय ६८० ते ७९९ मूल्यसाखळ्या तयार होऊ शकतील.”

दृष्टिक्षेपात सह्याद्री फार्म्स, २०२१

  • सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कं . लि. (१०० टक्के शेतकर्‍यांची मालकी)
  • चेअरमन/व्यवस्थापकीय संचालक : श्री. विलास विष्णूशिंदे, एम. टेक् . अॅग्री इंजिनिअरिंग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
  • रिटेल उपकंपनी : सह्याद्री अ‍ॅग्रो रिटेल्स लि.
  • द्राक्ष, डाळिंब, इतर फळे, टोमॅटो, के ळी, पेरू, कांदा, भाजीपाला, फुले, तांदुळ, कृषी पर्यटन यांच्यासाठी स्वतंत्र उपकं पन्या. सह्याद्री-सेन्सार्टिक्स ही हवामान केंद्र उभारणारी कंपनी
  • उत्पादन, काढणी, हाताळणी, मार्केटिंग आणि मुख्य म्हणजे भांडवल या समस्यांवर संघटितपणे मात.
  • २०२१ ची उलाढाल : सुमारे ५२५ कोटी
  • भारतातील सर्वांत मोठी द्राक्ष निर्यातदार कंपनी
  • भारतातील सर्वांत मोठी ‘ग्लोबल गॅप’ प्रमाणित कंपनी
  • मोहाडी येथे सुमारे १०० एकरवर अत्याधुनिक प्रकल्प, पॅकहाऊस, प्री-कुलिंग, कोल्ड स्टोअरेज, रायपनिंग, फ्रोजन व असेप्टिक पॅकेजिंग यंत्रणा
  • सात हवामान केंद्र, माती परीक्षण प्रयोगशाळा, बायो पेस्टीसाइड/फर्टिलायझर लॅब, रेसिड्यूटस्टींग लॅब, नर्सरी
  • विविध पिकांसाठी उभी ‘एं ड टू एं ड’ पुरवठा साखळी. दैनंदिन १००० टन प्रतिदिन फळे – भाजीपाला हाताळणीसाठी स्वतंत्र पॅक हाऊस
  • ४ हजार मे. टनाचे शीतगृह, प्रत्येकी २५ टनांचे १६ रायपनिंग चेंबर्स, पल्प आणि फ्रोझन असे दोन स्वतंत्र प्रक्रिया प्रकल्प, २०० टन क्षमतेचा ज्यूस, जॅम, जेली आणि के चअप प्रक्रिया युनट
  • केळी रोपांसाठी टिश्युकल्चर लॅब/नर्सरी
  • सह्याद्री फार्म्सच्या वतीने फलोत्पादन क्षेत्रातील शेतकरी उत्पादक कं पन्यांसाठी ‘एच-स्क्वेअर’ या इनक्युबेशन सेंटरची स्थापना

पुरस्कार आणि गौरव

सह्याद्री फार्म्सला आजवर महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक कृ षी निर्यात पुरस्कार, अपेडा एक्स्पोर्ट अवॉर्ड, भारत सरकार, ॲग्रोवन पुरस्कार, अप्पासाहेब पवार कृ षी पुरस्कार, आयबीएन शेती सन्मान पुरस्कार, सीआयआय चा बेस्ट पॅक हाऊस पुरस्कार, आउटलूक ॲग्रिकल्चर इनोव्हेशन अवॉर्ड, अण्णासाहेब शिंदे, रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्कार, ग्लोबल एफपीओ अवॉर्ड (इंडियन चेंबर ऑफ फू ड/ ॲग्रिकल्चर) आदी पुरस्कार व सन्मान लाभले आहेत.

https://sahyadrifarms.store/, www.sahyadrifarms.com/
www.facebook.com/SahyadriFarms/, www.facebook.com/SahyadriFarmsIn/
www.youtube.com/c/SahyadriFarms
Customer Care Tollfree number : 1800 212 002 020, care@sahyadrifarms.com

मराठी