दोन दशकांपूर्वी इलेक्ट्रिक व्हेईकलच्या संदर्भात जी परिस्थिती होती, त्यात आज आमूलाग्र बदल घडून आलेला दिसत आहे. पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना इलेक्ट्रिक व्हेईकल्स हा एक सक्षम पर्याय ठरू शकतो, असा विश्वास नागरिकांमध्ये नव्हता. त्यामुळे स्वाभाविकपणे ई-व्हेईकल्सची बाजारपेठ मर्यादित होती. गेल्या काही वर्षांत मात्र पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, प्रदूषणाचे घातक परिणाम यांमुळे इलेक्ट्रिक वाहने हाच भविष्यातील सक्षम पर्याय ठरणार आहे, हे जनमानसावर ठसू लागले आहे. भारतातच नव्हे, तर जगभरात हा नवा ट्रेंड सुरू झालेला असल्याने येणाऱ्या काळात घराघरांत इलेक्ट्रिक वाहनेच दिसू लागल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, असा विश्वास कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक झुमरमल तुनवाल यांनी व्यक्त केला.
घराघरांत ई-व्हेईकल पोहोचविणार तुनवाल!
काही वर्षांपूर्वी ई-व्हेईकलबाबत साशंक असणाऱ्या ग्राहकांची मानसिकता आता वेगाने बदलत असून, सर्वाधिक पसंती इलेक्ट्रिक वाहनांना मिळते आहे. पर्यावरणपूरक, पैशांची मोठी बचत करणार्या आणि विविध प्रकारच्या सुविधा देणाऱ्या ई-व्हेइकल्सना आता सर्वच स्तरांतून मागणी वाढत आहे. हा बदलता ट्रेंड लक्षात घेता, ‘तुनवाल ई-मोटर्सप्रा. लि.’ या कं पनीनेही ही नवी आव्हाने पेलण्यासाठी व्यावसायिक विस्तारावर लक्ष कें द्रित केले आहे. बाजारपेठेत नव्याने उतरलेल्या बड्या स्पर्धक कं पन्यांच्या बरोबरीने स्वत:चे स्थान निर्माण करण्याच्या दिशेने त्यांची पावले पडताना दिसत आहेत. या निमित्ताने कं पनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक झुमरमल तुनवाल यांच्याशी साधलेला संवाद.
‘तुनवाल ई-व्हेईकल’ला विशष पसंती
व्यावसायिक दूरदृष्टी ठेवून तुनवाल बंधूंनी ई-व्हेईकलच्या क्षेत्रात २०१६ सालीच पदार्पण केले. इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतलेल्या तुनवाल यांना सुरुवातीला एलईडी बोर्डच्या व्यवसायात उतरण्याची इच्छा होती. परंतु स्वत:ची ओळख प्रस्थापित करण्यासाठी, व्यावसायिक वेगळेपणा जपण्यासाठी आणि लोकांच्या उपयोगी पडेल असा व्यवसाय करण्याच्या हेतूने त्यांनी ई-व्हेईकलच्या क्षेत्रात पाऊल टाकले. ते किती योग्य होते, हे आज दिसून येते. त्यांचा सुरुवातीचा काळ संघर्षाचा आणि आव्हानात्मक होता. आज भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर तयार करणारी कंपनी म्हणून या कंपनीने नावलौकिक मिळविला आहे. ‘तुनवाल स्पोर्ट ६३’ आणि ‘तुनवाल स्टॉर्म झेडएक्स’ या मॉडेल्सना ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळाली. बदलते ट्रेंड लक्षात घेऊन अनेक नवे बदल केले जात आहेत आणि नवी उत्पादने बाजारात उतरविण्याची तयारी कंपनीने केली आहे.
विक्रीचा आलेख पाहिला, तर सर्वाधिक पसंती इलेक्ट्रिक वाहनांना आहे, हे दिसून येते. त्याचा कंपनीला नक्कीच लाभ होतो आहे.
इलेक्ट्रिक गाडीचा नवा ट्रेंड
आजच्या घडीला आपल्याकडे कोणतीही दुचाकी गाडी असली, तरीही जेव्हा नवीन गाडी घेण्याचा विचार मनात सुरू होतो, तेव्हा इंधनखर्चाच्या दृष्टीने परवडणाऱ्या म्हणून अर्थातच इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य दिले जाते. प्रदूषणविरहित, कमी खर्च आणि सुविधांनी युक्त असल्याने नवीन गाडी घेण्यासाठी उत्सुक असणारा आजचा ग्राहक पहिली पसंती इलेक्ट्रिक गाड्यांनाच देताना दिसतो आहे.
ट्रक, बसेसमध्येही इलेक्ट्रिकलाच प्राधान
इलेक्ट्रिक वेहिकलेकडे वाहन उद्योग क्षेत्राचा ओढा वाढतो आहे. दिल्लीमध्ये अलीकडेच झालेल्या एक्स्पोमध्येसुद्धा मोठ्या कंपन्यांच्या बसेस आणि ट्रक प्राधान्य इलेक्ट्रिकमध्येच येऊ लागले आहेत. हाय कपॅसिटी वेहिकलेमध्ये चार चाकी वाहनांमध्ये आणि दुचाकी वाहनांमध्ये सगळीकडे इलेक्ट्रिक वाहनांचाच बोलबाला सुरू झालेला आहे. त्यामुळे या क्षेत्रात आगामी काळात स्पर्धा खूप वाढणार आहे.
शासनाच भक्कम पाठबळ
नव्या तंत्रज्ञानाने युक्त आणि सुविधांनी सज्ज असणारी नवी इलेक्ट्रिक दुचाकी वाहने बाजारात येत आहेत. अशा सर्व वाहनांच्या उत्पादन व विक्रीसाठी आवश्यक असणारे सर्वतोपरी सहकार्य शासनाच्या वतीने मिळत असल्याने बाजारपेठेमध्ये अतिशय चांगली संधी उपलब्ध आहे. त्यामुळे अधिक सुरक्षित, दर्जेदार आणि चांगली वाहने ग्राहकांना उपलब्ध करून देण्याकडे कंपनीचा कल आहे. असेच उत्तम सहकार्य आणि नियोजनबद्ध असा मदतीचा हात राहिला, तसेच सुनियोजित धोरणे राहिली, तर भारत जागतिक बाजारपेठेतही मोलाची भूमिका बजावू शकेल, असा विश्वास तुनवाल यांनी व्यक्त केला.
प्रदुषण रोखण्यासाठी समर्थ पर्याय
पारंपरिक इंधनांच्या मदतीने चालणाऱ्या गाड्यांचा खूप सारा प्रसार जगभरात झाला खरा, परंतु इंधनाची उपलब्धता व त्यातून होणारी भाववाढ लक्षात घेता आता ही वाहने महागडी आणि गैरसोयीची वाटू लागली आहेत. वाढते प्रदूषण ही तर प्रत्येक शहरापुढची समस्या आहे. अशा वेळी कमी खर्चात उत्तम सुविधा देणारी, कमी वेळेत पटकन चार्जहोणारी इलेक्ट्रिक वाहने मात्र प्रदूषण रोखण्यासाठी एक समर्थ पर्याय ठरू शकतो, असे आता लक्षात येत असल्याने ई-व्हेईकल्सना स्वाभाविकपणाने पसंती वाढते आहे. पॉवर स्टोअरेजचे अनेक नवे पर्याय त्या दृष्टीने उपलब्ध होत असून, ग्राहकांसाठी ते अधिक सोयीचे ठरणार आहे.
तुनवाल यांच्या मते, शहरात आपण २५-५० किलोमीटरपेक्षा अधिक अंतर गाडी चालवतच नाही. अशा वेळी पेट्रोलसाठी पैसे खर्च करा, पंपावर रांगेमध्ये उभे राहा आणि पुन्हा-पुन्हा त्यात पेट्रोल टाकून खर्च वाढवत राहा, यापेक्षा इलेक्ट्रिक गाडी घ्या आणि मनसोक्त चालवा. आपल्या खर्चात लक्षणीय बचत होते आहे, असेही लक्षात येईल आणि इतर सगळे मनस्ताप कमी होतील. म्हणून इलेक्ट्रिक व्हेईकल हाच येणाऱ्या काळातील सर्वात उत्तम पर्याय ठरणार आहे.
तरुणाईची पसंती असलेली बाईक बाजारपेठेत
‘तुनवाल मोटर्स’ने सादर केलेल्या इतर अनेक मॉडेल्सप्रमाणे इलेक्ट्रिक बाईकला तरुणाईची विशेष पसंती लाभलेली आहे. या बाईकला तरुणाईची चांगली मागणी आहे. लूक अँड फीलच्या दृष्टीने तरुणांना पसंत पडेल अशी या बाईकची रचना केलेली असून, खर्चाच्या दृष्टीने मोठी बचत होत असल्याने या बाईकला चांगली मागणी येते आहे.
सौर ऊर्जा : भविष्याचा अखंडित स्रोत
सौरऊर्जेचा वापर करून त्या माध्यमातून वीजनिर्मिती करून वापर करणे, हे भविष्यातील सर्वात महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. कारण सौरऊर्जाहाच भविष्याचा अखंडित असा स्रोत असणार आहे. या माध्यमातून आपल्याला कधीही ऊर्जेचा तुटवडा भासणार नाही. इलेक्ट्रिक वाहने कितीही वाढली, तरीही तो एक उत्तम पर्याय राहील. आमच्या कंपनीच्या वतीने यात विशेष संशोधन केले जात आहे, असा विश्वास तुनवाल व्यक्त करतात.
राजस्थानातील उत्पादन प्रकल्प कार्यान्वित
‘तुनवाल ई-मोटर्स कंपनी’ने राजस्थानमध्ये गेल्या वर्षी जो नवीन उत्पादन प्रकल्प हाती घेतलेला होता तो आता पूर्णत्वाने कार्यान्वित झालेला असून, तेथे उत्पादनदेखील सुरू झाले आहे. दररोज येथे पूर्ण क्षमतेनुसार वाहनांचे उत्पादन होत आहे. या ठिकाणी शेकडो कर्मचारी काम करीत आहेत. प्रकल्पाच्या विस्ताराचे कामही लगेच हाती घेण्यात आले आहे. याखेरीज पुण्यात सणसवाडी येथे आणखी एक प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. त्यामुळे आता नवनवीन मॉडेलसह बाजारपेठेत कंपनी सातत्याने ई-वाहनांची मालिकाच सादर करू शकेल.
पॉवर स्टोअरेज वाढविणार
सौरऊर्जेसारख्या अक्षय ऊर्जास्रोताचा वापर करून पॉवर स्टोअरेज कसे करता येईल आणि त्याचा वापर व्यवहारात कसा करता येईल व ई-व्हेईकलसाठी उपयुक्त कसे ठरेल, याचा विचार सुरू आहे. आमच्या कंपनीकडे पॉवर स्टोअरेज तंत्रज्ञान उपलब्ध असून भविष्यात यात अधिक प्रगती करण्यावर विशेषत्वाने लक्ष केंद्रित केलेले आहे. सौरऊर्जेने स्वयंपूर्ण असलेल्या सोसायट्या येणाऱ्या काळात तयार होतील आणि त्यांची गरज भागवून इतरांना वीज देऊ शकतील, असे चित्र लवकरच निर्माण झालेले दिसेल, असे मत तुनवाल यांनी व्यक्त केले.
स्पर्धा वाढेल तितका ग्राहकांचाच लाभ
इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात आता सगळ्याच मोठ्या कंपन्या दाखल होत आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे स्पर्धा वाढेल. स्पर्धा वाढेल तितका ग्राहकांचा लाभ होणार आहे. स्पर्धा असेल तेव्हा ग्राहकांसमोर निवडीसाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात आणि निवडीला प्राधान्य देता येते. मोबाईलच्या क्षेत्रात जशी स्पर्धा वाढली आणि अनेक पर्याय उपलब्ध झाले आणि नव्या सुविधा प्राप्त होत गेल्या, तसेच या क्षेत्रात होणार आहे, असे तुनवाल यांनी स्पष्ट केले.
सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान
इलेक्ट्रिक वाहनांना आग लागते, त्यामुळे ती धोकादायक आहेत, अशी काही उदाहरणे अलीकडच्या काळात समोर आली खरी. परंतु उत्पादनांची गुणवत्ता पुरेशी न तपासता जेव्हा ती बाजारपेठेत घाईने सादर होतात, त्याने मार्केट खराब होते. हेच काही प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत झाले, परंतु आता तो गैरसमजसुद्धा दूर झालेला असून, अधिक सुरक्षित आणि चांगली वाहने बाजारात दाखल होत आहेत. सुविधेच्या जोडीला सुरक्षितता या विषयाला आम्हीदेखील सर्वोच्च प्राधान्य दिलेले आहे, असे तुनवाल यांनी सांगितले.
चार चाकीतून नेता येणारी इलेक्ट्रिक दुचाकी!
शहरातील वाहतुकीवरील वाहनांचा ताण पाहता, येणाऱ्या काळात चार चाकीतून नेता येणाऱ्या इलेक्ट्रिक व्हेईकल तयार केल्या जातील. आमची कंपनीही त्या प्रयत्नात आहे. शहराच्या एखाद्या भागापर्यंत चार चाकीने जायचे व त्यात इलेक्ट्रिक दुचाकी फोल्ड करून ठेवलेली असेल. तेथून दुचाकी काढून शहरातील सर्व कामे करून परत येता येऊ शकेल. भविष्यात शहरातील अनेक भाग ‘नो व्हेईकल झोन’ बनणार असल्याने त्या ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांचाच पर्याय स्वीकारावा लागेल. त्यामुळे या दिशेने आमच्या कंपनीच्या माध्यमातून संशोधन सुरू आहे, अशी माहिती झुमरमल तुनवाल यांनी दिली. आम्ही यात नवीन नसल्यामुळे आम्ही असे नवे प्रयोग करण्याचे धाडस दाखवू शकतो, असेही ते म्हणाले.
नवीन इलेक्ट्रिक मॉडेल बाजारात यणार!
काळाच्या बरोबर चालण्यात समजूतदारपणा असतो. जुन्या चांगल्या गोष्टी आपण सोडून न देता त्यात संशोधनाची भर घालतो. नव्याची कास धरताना जुन्या ई-व्हेईकलची निर्मितीही आपण करत आहोत. त्याचबरोबर नवीन सहा ते सात इलेक्ट्रिक व्हेईकलची मॉडेल्स नव्याने बाजारात सादर केली जाणार आहेत. त्यामध्ये अनेक अद्ययावत सुविधा येतील, सुरक्षिततेला प्राधान्य असेल, असे तुनवाल यांनी स्पष्ट केले.
भविष्यकालीन योजना
- वाहनांचे उत्पादन वेगवान करणार
- सौरऊर्जेद्वारा कार्यान्वित होणारी पॉवर स्टेशन्स उभारणार
- नवीन चार्जिंग स्टेशन्स सुरू करणार
- पॉवर स्टोअरेजचा विस्तार करणार
- कॉम्प्रेस्ड इलेक्ट्रिक व्हेईकलचे संशोधन
- अधिक अद्ययावत सोयी-सुविधांवर भर
अधिक माहितीसाठी किंवा सूचनांकरिता संपर्क :
844 844 8763
info@tunwal.com