कष्ट करण्याची तयारी असली, माणसे जोडण्याची कला असली आणि योग्य टप्प्यावर मार्गदर्शन मिळत गेले, की सर्वसामान्य कुटुंबातील तरुणही मोठी झेप घेऊ शकतो. अशीच वाटचाल आहे वसंत काटे यांची. ते सागं तात, ‘‘माझा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. वडील खडकीच्या दारूगोळा कारखान्यात नोकरीला होते. स्वाभाविकपणे मुलांनी शिक्षण घ्यावे आणि कुठेतरी नोकरी मिळवावी, एवढीच त्यांची माफक अपेक्षा होती. त्यांच्या इसचेनुसार माझा प्रवास सुरू होता. त्यामुळे आपण बांधकामक्षेत्रात येऊ आणि एवढा मोठा टप्पा गाठू, असे कधीही वाटले नव्हते. आयुष्यात एका वळणावर मित्रांचे सहकार्यमिळाले. त्यांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच हे सर्वशक्य झाले. वीस वर्षांपूर्वी २००३ मध्ये लावलेल्या ‘यशदा’ या छोट्याशा रोपट्याचे रूपांतर आज वटवृक्षात झाले आहे. गुणवत्तापूर्ण काम आणि ग्राहक हा केंद्रबिंदू मानून व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनामुळे ‘यशदा रिॲल्टी’चे अनेक बांधकाम प्रकल्प आज पुणे, तसेच पिंपरी-चिंचवडमधील विविध भागांमध्येदिसतात. कधीही जाता-येताना ते नजरेस पडतात, तेव्हा मनासारखे घर खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्यांची इच्छा पूर्ण करण्याच्या कामात आपला हातभार लागल्याचे समाधान मिळते.’’


यशदा रिॲल्टी ग्रुप : आपुलकी आणि विश्वासाचा पाया
घरात बांधकाम क्षेत्राशी संबंधित कोणतीही पार्श्वभूमी नसताना केवळ आपली इच्छाशक्ती आणि महत्त्वाकांक्षेच्या जोरावर बांधकाम व्यवसायात पदार्पण करून त्यामध्ये यश मिळविले. यश मिळविणे सोपे असते, मात्र मिळालेले यश वर्षानुवर्षे टिकवून ठेवत यशाची शिखरे गाठणे, हे सोपे नसते. ‘यशदा रिॲल्टी ग्रुप’ने मात्र हे साध्य करून दाखविले आहे. ‘यशदा रिॲल्टी ग्रुप’चा आजपर्यंतचा प्रवास पाहिला, तर तो अत्यंत थक्क करणारा असून, या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या उद्योजकांसाठी निश्चित प्रेरणादायी आहे. ठरलेल्या वेळेतच ताबा देण्याची परंपरा, गुणवत्तापूर्ण बांधकाम, ग्राहककेंद्रित कामकाज आणि नंतरही ग्राहकांना सेवा देण्याची बांधिलकी या चार तत्त्वांना अधीन राहून काम करण्याच्या पद्धतीमुळे ‘यशदा ॲल्टी ग्रुप’ने बांधकामक्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ‘यशदा रिॲल्टी ग्रुप’चे व्यवस्थापकीय संचालक वसंत काटे यांच्या प्रेरणादायी वाटचालीविषयी...
पालिकेची शाळा ते बांधकाम व्यावसायिक
आई-वडील आणि पाच भावंडे असे त्यांचे कुटुंब. वसंत आणि विजय हे दोन मुलगे आणि तीन बहिणी. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेत वसंत काटे यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झाले. त्यानंतर पिंपरी येथील नवमहाराष्ट्र विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात त्यांनी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. त्याचवेळी ‘एमआयडीसी’मध्ये कामाचा अनुभव घ्यायला सुरुवात केली. बारावीनंतर मेकॅनिकल इंजिनीअरिंगसाठी प्रवेश घेऊन पुढे कोठेतरी नोकरी करावी, असे त्यांनी ठरविले होते. पुढे मेकॅनिकल इंजिनीअरिंगला प्रवेश घेण्यासाठी फॉर्म भरण्याची तयारी केली. आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव देखील केली होती. ज्या कंपनीमध्ये काम करीत होते, तेथील वरिष्ठ अधिकारी पॉल यांनी सांगितले, की ‘अरे मेकॅनिकलपेक्षा तू सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी घे. त्याला पुढील काळात खूप महत्त्व येणार आहे.’ बांधकामक्षेत्र येणाऱ्या काळात कसे बदलणार आहे, याची माहिती मिळाल्याने त्यांनी मेकॅनिकलचा भरलेला फॉर्म रद्द करून सिव्हिल इंजिनीअरिंगसाठी प्रवेश घेतला. शिक्षण सुरू असतानाच छोटी छोटी कामे घेण्यास सुरुवात केली.

मित्रांच्या सहकार्यातून पहिला प्रकल्प
आता सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे, तेव्हा आपण मोठी स्वप्ने पाहायची आणि ती प्रत्यक्षात आणायची, असा निर्धार त्यांनी केला होता. त्याविषयी ते म्हणतात, ‘‘स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा असून चालत नाही, तर त्यासाठी खिशात पैसाही असावा लागतो. त्या वेळी माझ्याकडे केवळ एक लाख रुपये होते. मग मित्रांशी चर्चा केली. काही मित्रांकडून २५,००० तर काहींकडून ५०,००० रुपये वर्गणी काढून पिंपळे-सौदागर येथे सात गुंठे जागा घेतली. या जागेत ‘यशदा रिॲल्टी ग्रुप’चा ‘यशदा स्क्वेअर’ हा पंधरा सदनिकांचा पहिला गृहप्रकल्प उभा राहिला. ज्या मित्रांनी मदत केली होती, त्यांना या प्रकल्पात सदनिका दिल्या आणि उरलेल्या सदनिकांची विक्री केली. हातात शिल्लक राहिलेल्या पैशांतून नवीन ठिकाणी कामाला सुरुवात केली. पहिल्या गृहप्रकल्पामुळे आत्मविश्वास प्राप्त झाला होता. पुढील काळात बांधकाम प्रकल्प करायचे असतील, तर आपल्याकडे जमीन असणे गरजेचे आहे. या विचाराने लँड बँक करण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात जमिनीची खरेदी-विक्री करून भांडवल उभारणी केली. २०१० मध्ये ‘यशदा रिॲल्टी’ने पुन्हा एकदा बांधकाम प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली. लोहगाव परिसरात २५० फ्लॅट्सचा प्रकल्प पूर्ण केला. त्यानंतर मोशी, धानोरी, वाकड, रावेत, पिंपरी, चाकण अशा विविध भागांत ‘यशदा रिॲल्टी’चे गृहप्रकल्प आणि व्यावसायिक संकुले उभी राहिली.’’
ते म्हणतात, ‘‘आमचे शेतकरी कुटुंब. कोणी कधीही व्यवसाय केला नव्हता. वडील नोकरीला होते. त्यामुळे मुलांनीदेखील कोठेतरी नोकरी करून लवकर स्थिरस्थावर व्हावे, अशी त्यांची स्वाभाविक अपेक्षा होती. मी बांधकाम व्यवसायात उतरल्यावर, आई-वडील सांगायचे, ‘हे काय खरे नाही. यामध्ये चढउतार येत राहतात. ते पचवण्याची ताकद लागते. ते आपले काम नाही. त्यामुळे तू कोठेतरी नोकरीच कर आणि स्थिरस्थावर हो.’ त्यांची समजूत काढून आपल्याला आता याच क्षेत्रात करिअर करायचे आहे, या महत्त्वाकांक्षेने झपाटून काम करू लागलो.’’
आई-वडिलांचे संस्कार
कौटुंबिक संस्कारांविषयी सांगताना ते म्हणतात, ‘‘आईवडिलांची नाराजी असताना त्यांची समजूत काढून या क्षेत्रात प्रवेश केला. त्यामध्येयश मिळविले. याचा सर्वात अधिक आनंद माझ्या आई-वडिलांना आहे. ‘कितीही मोठा झालास तरी नीतिमत्तेला धरून काम कर, कोणाचीही फसवणूक करू नको आणि आपल्या दारात कुणी येईल असे वागू नको,’ अशी शिकवण आई-वडिलांनी दिलेली आहे. त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी मनात खोलवर रुजलेल्या आहेत. आई-वडील सांगतात, ‘ज्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आहे अशा ग्राहकांच्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही, अशी तुझी वागणूक असली पाहिजे.’ त्यांचा कायम आग्रह असतो, की पैशाच्या मागे न धावता समाजातील विविध घटकांतील गरजू लोकांना परवडतील अशा दरात हक्काचे घर कसे उपलब्ध करून देता येईल यासाठी तू सदैव प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्यांनी दाखविलेल्या मार्गाने ‘यशदा रिॲल्टी ग्रुप’ची वाटचाल सुरू असून, यापुढील काळातही त्याच पद्धतीने काम करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे,’’ असे वसंत काटे यांनी सांगितले.
दिलेला शब्द पाळण्यासाठी…
कितीही अडचणी आल्या आणि प्रतिकूल परिस्थिती असली तरी थांबायचे नाही, सगळ्या आव्हानांना आणि समस्यांना तोंड देत पुढे जात राहायचे, असा काटे यांचा स्वभाव आहे. त्यामुळेच कोणत्याही समस्येवर त्यांच्याकडे उत्तर असते, पर्याय असतो. त्याविषयी ते सांगतात, की अडीच-तीन वर्षांपूर्वी उद्भवलेल्या कोरोनाच्या परिस्थितीचा फटका वेगवेगळ्या क्षेत्रांना बसला. त्यामध्ये बांधकाम क्षेत्रही होते. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने केंद्र आणि राज्य सरकारने अनेक बंधने घातली होती. अशा परिस्थितीत ग्राहकांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी दिलेल्या मुदतीत प्रकल्पाचे काम पूर्ण करून सदनिकांचा ताबा देण्याचे मोठे आव्हान आमच्यासमोर होते. ठरवून दिलेल्या मुदतीत प्रकल्पाचे काम करून ग्राहकांना ठरलेल्या वेळेत घरांचा ताबा देणारे बांधकाम व्यावसायिका अशी ख्याती ‘यशदा रिॲल्टी’ने कमावलेली आहे. कोविडच्या काळात आलेल्या अडचणी लक्षात घेऊन बांधकाम प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ‘रेरा’ने आम्हाला एक वर्षाची वाढीव मुदत दिली होती. त्यामुळे काही महिने उशिरा ग्राहकांना सदनिकांचा ताबा दिला असता, तरी काही बिघडले नसते. मात्र ग्राहकांना दिलेला शब्द पाळणे, हे आमचे तत्त्व असल्याने कोरोनाच्या काळातही आवश्यक ती काळजी घेत, कामगारांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सोयीसुविधा पुरवून आम्ही प्रकल्पांची कामे पूर्ण केली. या काळात कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक ते अन्नधान्य, गृहोपयोगी वस्तू, तसेच मेडिकल सुविधा देखील ‘यशदा रिॲल्टी ग्रुप’च्या वतीने पुरविण्यात आली होती. कोविडची रुग्णसंख्या वाढत असल्याने दोन महिने काम बंद ठेवण्यात आले होते. अनेक कामगार त्यांच्या मूळे गावले होते. निर्बंध शिथिल झाल्यानंतर रखडलेले काम पूर्ण करून नियोजित वेळेवर ग्राहकांना त्यांच्या फ्लॅटचा ताबा देण्यासंदर्भातील शब्द पाळण्यासाठी ‘यशदा रिॲल्टी’ने कामगारांना त्यांच्या गावावरून विशेष बस, रेल्वे आणि प्रसंगी प्रवासासाठी विमानाची सुविधा देखील उपलब्ध करून दिली. तसेच कोरोनाच्या काळात ‘यशदा रिॲल्टी ग्रुप’ने कोणाचेही पेमेंट देण्यास विलंब केला नाही.
३०० पेक्षा अधिक कर्मचारी
२००३ ते २०१० या सात वर्षांच्या कार्यकाळामध्ये ‘यशदा रिॲल्टी ग्रुप’मध्ये केवळ बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी होते. सध्या ‘यशदा रिॲल्टी’मध्ये ३०० हून अधिक कर्मचारी काम करीत आहेत. यामध्ये इंजिनीअर, मार्टिकेगं, सेल्स एक्झिक्युटिव्ह, डिझायनिगं, फायनान्स, कस्टमर एक्झिक्युटिव्ह, रिलेशन मनेजर अशा विविध घटकांचा समावेश आहे.
सोयी-सुविधांची मागणी
वसंत काटे म्हणतात, ‘‘गेल्या काही वर्षांत घरांची संकल्पना बदलत आहे. पूर्वी केवळ राहण्यासाठी डोक्यावर एक छप्पर असावे, एवढीच नागरिकांची अपेक्षा असायची. राहण्यासाठी हक्काची जागा असावी या दृष्टीने घर, फ्लॅटची खरेदी केली जात होती. मात्र आता परिस्थिती बदललेली आहे. बदलत्या काळानुसार त्या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधा, तेथील फिटिगं कसे आहे, फ्लॅटला फरशी कोणती लावली जाणार आहे, भिंतींचे रंग कसले आहेत, त्यामध्ये काही सोयी-सुविधा आहेत का, सोसायटीमध्ये लहान मुलांसाठी, जेष्ठ नागरिकांसाठी काय सोयी आहेत? गार्डन आहे का? क्लबहाऊस आहे का? स्विमिगं पूल, जिम, छोटासा कार्यक्रम करण्यासाठी स्टेज आहे का? याबाबत ग्राहकांकडून विचारले जाते. ग्राहकांकडून होणारी विचारणा लक्षात घेता अधिकाधिक सोयी-सुविधांनीयुक्त घरे देण्याचा आमचा प्रयत्न असतो. ‘यशदा रिॲल्टी’च्या अनेक गृहप्रकल्पांमध्ये गार्डन, क्लबहाऊस, जिम यांसारख्या सुविधा यापूर्वीच दिल्या जात होत्या. मात्र आता काही नवीन गृहप्रकल्पांमध्ये पाहुण्यांना राहण्यासाठी खोली (गेस्ट रूम), प्रथमोपचारांची सुविधा (फर्स्टएड), तसेच डॉक्टरांना बसण्यासाठी खोली अशा सुविधाही पुरविल्या जात आहेत. कुटुंबातील प्रत्येक वक्ती कमावती असल्याने ग्राहकांच्या गरजा आणि मानसिकतेमध्ये आता बदल झाला आहे. त्यांच्या मागणीनुसार त्यांना सोयी उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान आज सर्वांसमोर आहे.
कामाची गुणवत्ता, वेळेवर ताबा
ग्राहकांचे समाधान आणि फ्लॅटविक्रीनंतर दिली जाणारी सेवा या महत्त्वाच्या गुणांमुळेच ‘यशदा रिॲल्टी ग्रुप’ ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरला आहे. एकदा फ्लॅटचा ताबा दिला, की आपली जबाबदारी संपली, अशी भूमिका ठेवून ‘यशदा रिॲल्टी’ कधीही काम करीत नाही. गृहप्रकल्प पूर्ण करून त्याचे हस्तांतर ग्राहकांना केल्यानंतर पुढील पाच वर्षे त्याच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी ‘यशदा रिॲल्टी ग्रुप’कडून घेतली जाते. यासाठी मेंटेनन्स डिपार्टमेंट तयार केले आहे. गृहप्रकल्पात फ्लॅट घेतलेल्या कोणत्याही ग्राहकाला स्ट्रक्चरल अडचण, गळती, भिंतीला ओल येणे, दरवाजे खराब होणे, फ्लॅटचे कडीकोयंडे खराब होणे, तसेच नादुरुस्त नळ आणि बांधकामासंदर्भात इतर काही अडचणी आल्यास त्याची तातडीने दखल घेऊन मेंटेनन्स डिपार्टमेंटमार्फत हे प्रश्न सोडविले जातात. या सेवेमुळे ‘यशदा रिॲल्टी ग्रुप’वरचा ग्राहकांचा विश्वास वाढतो आहे. ग्राहकांचे समाधान आणि आनंद हा सर्वोच्च आहे, ही गोष्ट लक्षता घेऊन ग्राहककेंद्री विचाराने काम करीत असल्यामुळे ‘यशदा रिॲल्टी’च्या कोणत्याही नवीन गृहप्रकल्पामधील चाळीस टक्के फ्लॅटचे बुकिंग हे जुन्या ग्राहकांच्या शिफारशीवरून होत असते.
‘कायझेन’चा वापर
नवीन प्रकल्पाच्या कामासंदर्भात माहिती देताना वसंत काटे म्हणतात, की प्रत्येक वेळेस नवीन प्रयोग करण्यावर आमचा भर असतो. ‘कायझेन फिलॉसॉफी’चा वापर करून हे प्रयोग केले जातात. ज्या भागात प्रकल्प उभारण्यात येत आहे, त्या भागातील नागरिकांची गरज काय आहे, तेथे काय सुविधा आहेत, तेथे फ्लॅट घेणारा नागरिक कोणत्या स्तरातील आहे, त्याची आर्थिक क्षमता, या सगळ्याचा अभ्यास करून त्यानुसार संबंधित भागात गृहप्रकल्प उभारण्याचे निश्चित केले जाते. अशा पद्धतीने शहरातील विविध भागांत ‘यशदा रिॲल्टी ग्रुप’च्या माध्यमातून २५ पेक्षा अधिक गृहप्रकल्प उभारण्यात आले असून, यामध्ये पाच हजारांहून अधिक ग्राहकांचे समाधान करण्यात आले आहे. सध्या ‘यशदा रिॲल्टी’च्या दहा प्रकल्पांचे काम सुरू आहे. यामध्ये गृहप्रकल्प आणि व्यावसायिक संकुलांचा समावेश आहे. पुढील तीन वर्षांत सहा हजार फ्लॅट बांधून त्याचे वितरण करण्याचे नियोजन आहे.
१,१०० फ्लॅट्सचा ‘यशदा सुप्रीम’
मोशी-डुडुळगाव येथे ‘स्प्लेंडिड पार्क’ हा एक हजार फ्लॅटचा प्रकल्प पूर्ण झाला आहे. याच भागात अकराशे फ्लॅटचा ‘यशदा सुप्रीम’ या प्रकल्पाचे काम सुरू असून, पुढील अडीच वर्षांमध्ये पझेशन देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. गृहप्रकल्पांचे बांधकाम करताना अधिकाधिक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न असतो. बांधकाम करताना अद्ययावत यंत्रणा वापरल्याने कामाचा वेग वाढतो, त्याची कमीत कमी वेळेत तपासणी होते. परिणामी दिलेल्या मुदतीच्या आधीच काम पूर्ण होते.
सर्व घटकांचा विचार
समाजातील सर्वच घटकांतील नागरिकांना त्यांच्या स्वप्नातील हक्काचे घर उपलब्ध व्हावे, यासाठी ‘यशदा रिॲल्टी’ कार्यरत आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, आणि अतिउच्च घटकातील नागरिकांसाठी प्रकल्प उभारले जात आहेत. मोशी, डुडुळगाव, पिंपरी, रावेत या भागांत हे प्रकल्प असून, पिंपळे सौदागर येथे आलिशान लक्झुरियस प्रकल्प उभारण्यात येत आहे. तेथे ३० ते ३५ लाख रुपयांपासूनते तीन ते चार कोटी रुपयांचे फ्लॅट उपलब्ध आहेत.
कामगारांचा मोठा वाटा
‘यशदा रिॲल्टी ग्रुप’चा विस्तार होण्यामागे कंपनीतील पार्टनर, इंजिनीअर, आर्किटेक्ट, सेल्स मॅनेजर यांबरोबरच साईटवर काम करणारे असंख्य कामगार यांचा मोठा वाटा आहे. कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सुविधा देण्याबरोबरच बांधकाम साईटवर काम करणाऱ्या कामगारांची विशेष काळजी घेतली जाते. ‘यशदा रिॲल्टी ग्रुप’च्या सर्व साईटवर दुपारचे जेवण हे कामगारांना कंपनीच्या वतीने दिले जाते. हे जेवण देताना ते चांगल्या प्रतीचे कसे असेल याकडे लक्ष दिले जाते. कारण कामगार समाधानी-आनंदी, तेवढे काम करण्याची क्षमता अधिक वाढते. यामुळे तो अधिक कुशलतेने आणि वेगाने काम पूर्ण करतो. प्रत्येक साईटवर कामगार आणि त्यांच्या कुटुंबासाठी लेबर कॅम्प तयार केले जातात. कामगारांची आरोग्य तपासणी केली जाते. कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्रास होत असेल, तर आवश्यक ती वैद्यकीय सेवा देखील उपलब्ध करून दिली जाते. बांधकाम साईटवर काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेवर विशेष भर दिला जातो. कामगारांना सुरक्षिततेसाठी हँडग्लोव्ह्ज, हेल्मेट यांसह इतर वस्तूंचे वाटप करून आवश्यक ती सुरक्षिततेची साधने परिधान केल्यानंतरच साईटवर काम करण्याची परवानगी दिली जाते. आवश्यक ती काळजी घेतल्यामुळेच ‘यशदा रिॲल्टी ग्रुप’च्या माध्यमातून आजपर्यंत करण्यात आलेल्या प्रत्येक प्रकल्पाचे काम हे अपघात किंवा दुर्घटनेशिवाय पूर्ण झालेले आहे.
महानगरांसमोरील आव्हाने
बदलत्या पिंपरी-चिंचवड महानगराविषयी ते म्हणाले, की काही वर्षांपूर्वीचे आणि आत्ताचे पिंपरी-चिंचवड शहर यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. अत्यंत झपाट्याने वाढणारे शहर अशी ओळख आता या शहराची झालेली आहे. मेट्रो, ‘पीएमपीएमएल’ बरोबरच सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेसाठी काम करणारे घटक वाढत आहेत. सर्व स्तरांतील नागरिकांच्या घरांच्या आणि व्यावसायिक जागेच्या गरजा भागविण्यासाठी उंच इमारती उभ्या राहत आहेत. त्यामुळे अनेक पायाभूत सुविधांवर पुढील काळात ताण येणार आहे. प्रदूषणातही वाढ होणार आहे. नागरिकांनी अधिकाधिक सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला पाहिजे, यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येकाला पुरेसे पाणी, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते, सक्षम ड्रेनेज व्यवस्था, यासाठी दूरदृष्टी ठेवून क्षमता वाढविण्याची गरज आहे. यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलून आवश्यक ते निर्णय घेणे गरजेचे आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी इकोफ्रेंडली आणि स्वयंपूर्ण प्रकल्प उभे राहिले पाहिजेत, यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन राज्य सरकारने त्यासाठी पुढाकार घेणे अत्यंत गरजेचे आहे, असे वाटते.



सामाजिक उपक्रम आणि सन्मान
समाजातील विविध घटकांसाठी ‘यशदा रिॲल्टी ग्रुप’ काम करतो. ज्या समाजात आपण राहतो त्याचे देणे लागतो, या भावनेतून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये आरोग्य तपासणी शिबिर, पिंपरी-चिंचवड हाफ मॅरेथॉन स्पर्धा, करिअर मार्गदर्शन यांचा प्रामुख्याने समावेश असतो. काही महिन्यांपूर्वी शहरातील अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची कमतरता जाणवत होती. ही बाब लक्षात घेऊन ‘यशदा रिॲल्टी ग्रुप’चे व्यवस्थापकीय संचालक वसंत काटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. यामध्ये स्वतः वसंत काटे यांच्यासह संचालकांनी रक्तदान केले. बांधकाम साईटवर काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठीदेखील विविध उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये काटे यांचे सहकारी विजय काटे, सूर्यकांत जाधव, संजय भिसे, रोहिदास गवारे यांचे योगदान असते. ‘यशदा रिॲल्टी’च्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कामाची दखल घेत अनेक संस्था, संघटनांकडून विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. लोकमत पीसीएमसीआयकॉन २०१५, स्प्लेन्डिड स्क्वेअर प्रकल्पासाठी २०१६ वर्षाचा आर्किटेक्ट-इंजिनीअर्स-सर्व्हेअर असोसिएशनचा (एईएसए) पुरस्कार, ट्रायोझ प्रकल्पासाठी २०१८ चा एईएसएचा पुरस्कार, तर २०१९ मध्ये टाइम्स ऑफ इंडिया रिअल इस्टेट आयकॉन ऑफ पुणे असे पुरस्कार मिळालेले आहेत.
संपर्क :
‘यशदा रिॲल्टी’
गोविंद-यशदा चौकाजवळ, पिंपळे सौदागर,
पुणे – ४११ ०२७, महाराष्ट्र, भारत.
संपर्क : 89565 55619 , 99225 00004
email: info@yashadarealty.com
www.yashadarealty.com