ते सगळे एकमेकांच्या परिचयाचे होते. केवळ ओळख नव्हती, तर एकमेकांसोबत काम केले होते आणि त्यातून परस्परांविषयीचा अतूट विश्वास निर्णमा झाला होता. कोणी गुजरातमधील सुरेंद्रनगरला, कोणी भोपाळला, तर कोणी दिल्लीत, नेपाळला अशा वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करीत असताना भेटलेले. सगळ्यांच्या मनात एकत्र येऊन स्वतःचा उद्योग-व्यवसाय करायचा, अशी तीव्र इच्छा होती. आपण दिवसातील दहा ते अठरा तास काम करीत असतो. त्याऐवजी आपल्यासाठीच कष्ट करूया, असे सगळ्यांनाच मनोमन वाटत होते. मग २००५ मध्ये ते सगळे प्रत्यक्ष भेटले आणि त्यातून जन्माला आली ‘थ्री-पी सोल्युशन्स लिमिटेड’ ही फूड इंडस्टरी्च्या क्षेत्रात सर्वसमावेशक काम करणारी कंपनी. डेअरी टेक्नॉलॉजीमधील तज्ज्ञ शेखर काळे, फूड टेक्नॉलॉजीमधील अनुभवी मनीष अंतवाल, इलेक्ट्रिकल इंजिनीअर सुधीर गाजरे, केमिकल इंजिनीअर सुधीर फिस्के, मायक्रोबॉयोलॉजिस्ट ओमप्रकाश यादव, वाणिज्य शाखेचे पदवीधर ओमप्रकाश चुडाल अशी ही सर्वसमावेशक टीम होती.
थ्री पी ग्रुप : फूड इंडस्ट्रीसाठीची सर्व सोल्युशन्स एकाच छताखाली
नोकरी करणाऱ्यांपैकी अनेकजण आपला स्वतःचा उद्योग-व्यवसाय असावा, अशी स्वप्ने पाहतात. मात्र त्या स्वप्नांना जिद्द, चिकाटी आणि कष्टाचे पंख लागले, तरच ती प्रत्यक्षात येतात. वेगवेगळ्या ठिकाणी कधी एकत्र, एका कंपनीत काम करणाऱ्या आणि उद्योगाची स्वप्ने पाहणाऱ्या पाच-सहा जणांनी एकत्र येत फू ड इंडस्ट्रीसाठी एका छताखाली सर्व सेवा देण्याचा उद्योग सुरू केला आणि गेल्या अठरा वर्षांत मोठी भरारी घेत आणखी तीन कंपन्या सुरू केल्या. ‘मिष्ट्री’ हा स्वत:चा ब्रँड बाजारात आणला. वेगळ्या चवीच्या आणि स्वादिष्ट अशा ‘थ्री-पी ग्प’च्रु या वाटचालीची ही तितकीच खमंग रेसिपी...
सर्वगुणी टीम
या सगळ्यांचे नेतृत्व आले होते शेखर काळे यांच्याकडे. ते सांगतात, “या टीममधील प्रत्कजयेण स्वतःच्या विषयात तज्ज्ञ होताच, पण फूड टेक्नॉलॉजीमधील सगळी माहिती आणि पडेल ते काम करण्याची तयारी अशी ही टीम आहे. प्रत्क ज ये ण टीम लीड करण्यात एक्स्पर्ट. चुडाल वाणिज्य पदवीधर असला, तरी त्याला इंजिनीअरिंगचे सगळे व्यावहारिक आणि प्रत्यक्ष स्वरूपाचे ज्ञान आहे. त्याला मी एकदा रुमानियाला पाठविले. तेथील कारखान्यातील एका मशीनची समस्या होती. ते मशीन त्याने कधीही पाहिले नव्हते. एवढेच नव्हे, तर मशीनचे नाव त्याने पहिल्यांदाच ऐकले होते. तरीही तेथे जाऊन त्याने मशीन सुरू करून दिले आणि वर त्या कंपनीला दोन मशीन पुरविण्याची ऑर्डर घेऊन आला.”
नेव्हर गिव्हअप…
त्यातूनच मग फूड टेक्नॉलॉजीमध्ये काम करणारी ‘थ्री पी सोल्युशन्स कंपनी’ आकाराला आली आणि आज ती वेगाने विस्तारत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे, एकमेकांचा परस्परांवरील विश्वास आणि त्याबरोबर लीडर म्हणून शेखर काळेंवर सगळ्यांचा असलेला गाढ विश्वास. त्या विषयी मनीष अंतवाल सांगतात, ‘‘बाप मुलाला वर फेकतो, तेव्हा ते मूल खिदळत असते. त्याला विश्वास असतो, की बाप आपल्याला परत झेलणारच आहे. तसा सगळ्यांचा शेखर सरांवर विश्वास आहे. ते कोणाचेही वाईट करणार नाहीत, हा अतूट विश्वास आतापर्यंतच्या वाटचालीत महत्त्वाचा ठरलेला आहे. सुरुवातीच्या काळातच आम्हाला पैशांपेक्षा नीतिमूल्यांना महत्त्व देणारी माणसे भेटली. त्यांनी केलेले संस्कार नंतरच्या काळात कायम उपयोगी ठरले. आर. डी. शेणॉय सर त्यापैकी एक. ते आम्हाला भेटले तेव्हा ६०-६५ वर्षांचे असतील. अजूनही ते काम करतात.’’
त्यांच्या आठवणी सांगताना शेखर काळे म्हणतात, ‘‘शेणॉय सर कॅडबरीत उच्चपदस्थ अधिकारी होते. अठरा-अठरा तास काम करायचे. रात्र झालेली असायची, ट्रायल पुन्हा एकदा फेल गेलेली असायची. आम्हाला वाटायचे, आता घरी निघूया. तेवढ्यात ते म्हणायचे, ‘चला तयार व्हा. परत ट्रायल करायची आहे. ट्रायल यशस्वी होईपर्यंत जागा सोडायची नाही.’ अशी त्यांची कामाची पद्धत. आमची जडणघडण तशीच झाली. नेव्हर गिव्हअप. अडचणी आल्या तरी तक्रारी करीत बसण्यापेक्षा ते आव्हान आनंदाने स्वीकारून सोल्युशन काढायचे.’’ सुधीर फिस्के म्हणतात, ‘‘शेणॉय सरांबरोबर काम करताना आम्ही खूप चुका केल्या, अगदी मूर्खासारख्या चुका केल्या, पण प्रत्येक वेळी त्या परिस्थितीतून शेणॉय सर आम्हाला शांतपणे बाहेर काढायचे आणि विचारायचे, यातून काय शिकला? आता ते इम्प्लिमेन्ट करा.’’
नीतिमूल्यांना सर्वोच्च महत्व
दिवसांविषयी काळे सांगतात, ‘‘पैसा नसताना नोकरी सोडून आम्ही उद्योगात पाऊल ठेवले. तेव्हा आपली बुद्धी आणि अनुभव वापरायचा हे ठरलेले होते. म्हणजे कन्सल्टन्सी करायची. पण कन्सल्टंट म्हटले, की शक्यतो त्याच्याकडे चुकीचे बघितले जायचे. आमची काही मूल् आणि ये नियम होते. त्यामुळे आपल्या नावाला डाग लागेल असे काही करायचे नाही, हे निश्चित होते. २००५ साली काम सुरू केले आणि उत्तराखंडमधील रुद्रपूर येथील सदगुरू फुड्स या कंपनीचा पहिला प्रोजेक्ट मिळाला आणि वर्षभर घर चालविण्याची बेगमी झाली. हा प्रोजेक्ट केवळ रिलेशनवर मिळाला होता. नेपाळमध्ये नोकरीत असताना त्यांच्या कंपनीसाठी काही काम केले होते. त्या वेळी त्यांनी कामाची पद्धत पाहिली होती, त्यामुळे निर्धास्त होऊन त्यांनी आम्हाला काम दिले. आम्ही आजदेखील पैसे वाजवून घेतो, पण ते श्रमाच्या साजेसे असतात. काम असे करायचे की कस्टमरला पैसे देताना आनंद वाटला पाहिजे. आतापर्यंत सात ते आठ हजार कोटी रुपये किमतीच्या मशिन्स क्लाएंटला खरदेी करून दिल्या आहेत, पण या सगळ्या व्यवहारात डाग लागेल असे कधी घडले नाही. त्याचबरोबर चूक स्वीकारण्याची तयारी, चुकीचे अजिबात समर्थन करीत बसायचे नाही, अशी कामाची पद्धत आहे. अनेकदा क्लाएंटशी वादविवाद, मतभेद होतात, तांत्रिक बाबींमध्ये कमी-जास्त होते, पण नीतिमूल्यांबाबत तडजोड केली जात नाही. जे काही प्रोजेक्ट्स आमच्याकडे आले त्यासाठी ही नीतिमूल् कामी आली.”
कंपनीची सरुवात
दरम्यानच्या काळात शेखर काळे यांना इंग्लंडमधील प्रख्यात फूड कंपनीकडून टेक्निकल हेड म्हणून काम करण्यासाठी ऑफर आली. अनुभव घेऊन सहा महिन्यांत परत यायचे, असे ठरवून ते इंग्लंडला गेले आणि सहा महिन्यांनी त्या कंपनीकडून सीईओपदाची ऑफर असताना भारतात परत आले. ते सांगतात, ‘‘भारतात आल्यावर श्री. विकास दांगट यांची मोलाची साथ मिळाली. त्यांनी पुण्यासारख्या ठिकाणी आमची ऑफिस, घर याची सगळी व्यवस्था केली. ‘थ्री पी’च्या फाऊंडेशनमध्येदांगट सरांचा मोलाचा वाटा आहे. आल्यावर आता व्यवसाय वाढत असला, तरी त्याची काही रचना केली पाहिजे, त्या रचनेला नाव दिले पाहिजे, जबाबदाऱ्या निश्चित करणे, या दिशेने काम सुरू केले आणि त्यातून प्रोजेक्ट डेव्हलपमेंट, प्रोसेस डेव्हलपमेंट, प्रॉडक्शन डेव्हलपमेंट या कामांच्या आधारावर ‘थ्री पी सोल्युशन्स कंपनी’ आकाराला आली. अर्थात, कोणालाही पदे दिली नव्हती. आजतागायत पदे नाहीत. टीम एकसंघ असण्यावर आणि एकत्रित वाढीवर ‘थ्री पी सोल्युशन्स’चा विश्वास आहे.’’
आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी सहकार्य
सुधीर गाजरे हे फूड इंडस्टरी्मधील कोणत्याही मशीनची सगळी कुंडली मांडणारे तज्ज्ञ आहेत. त्यांच्याविषयी सांगताना काळे म्हणाले, ‘‘२००६ मध्ये भोपाळच् या कंपनीतील मशीनला एक समस्या आली होती आणि ती दरू होत नव्हती. त्यासाठी जवळपास एक कोटी रुपये खर्च सांगण्यात आला होता. सुधीर गाजरे तेथे गेले आणि आठ दहा दिवस उभे राहून त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. ज्या प्रॉब्लेमसाठी त्या कंपनीला एक कोटी रुपये खर्च येणार होता, तो प्रॉब्लेम केवळ दोन ते अडीच लाखांमध्येदरू झाला. त्यातून आमचा आत्मविश्वास वाढला.’’ त्याचवर्षी फूड इंडस्टरी्साठी मशिन्सचे उत्पादन करणाऱ्या बेकर-पर्किन्स या ब्रिटनमधील कंपनीचे भारतातील विक्रीपश्चात सेवा देण्याचे काम ‘थ्री-पी सोलुशन’ला मिळाले. त्या काळात करविषयक सवलती आणि अन्य सुविधांमुळे हरिद्वार परिसरात फूड इंडस्टरी्शी संबंधित अनेक कंपन्या काम करीत होत्या. तेथील प्रिया गोल्ड या कंपनीचा प्रोजेक्ट मिळाला. त्याच वेळी काळेंनी अमेरिकन कंपनीत नोकरी करीत असलेल्या मनीष अंतवाल यांना सांगितले, की ‘मनीष, तू आता ‘थ्री-पी सोलुशन’ला जॉईन हो.’
ग्राहक, विक्रेत्यांकडून प्रशिक्षण
एकदम सगळ्यांनी नोकऱ्या न सोडता काम वाढत जाईल तसे एकेकाला सामावून घेण्याचे धोरण होते आणि तेच यशस्वी ठरले. काळे सांगतात, ‘‘प्रिया गोल्डचा प्रोजेक्टही रिलेशनमधून मिळाला. बिस्किटांच्या क्षेत्रात असलेल्या या कंपनीला त्या वेळी चॉकलेटमध्ही प ये दार्पण करायचे होते. त्यासाठीची मशिन्स, इन्व्हेस्टमेन्ट असा सगळा तो प्रोजेक्ट ‘थ्री-पी सोल्युशन्स ’ला करायचा होता. त्या कंपनीचे सर्वेसर्वा बी. पी. आगरवाल हे अतिशय शिस्तशीर व्यक्तिमत्त्व. त्यांनी आधी चीनला जाऊन काही मशिन्स आणल्या होत्या, पण त्या चालल्या नाहीत. नंतर आम्ही मग टर्कीच्या मशिन्स आणल्या. त्यांची शिस्त एवढी होती, की त्या वेळी दिल्लीहून हरिद्वारला पोहोचायला पाच तास लागायचे. सकाळी पाच वाजता निघायची वेळ त्यांनी सांगितली असेल, तर आम्ही राहत असलेल्या हॉटेलच्यादारात त्यांची गाडी ४.५५ ला हजर असायची. त्यांना स्वतःच्या वेळेची किंमत होती, तशीच दुसऱ्याच्या वेळेचीही होती. त्यामुळे त्यांच्या केबिनबाहेर कोणाही व्यक्तीला ते ताटकळत ठेवत नसत. कोणी व्यक्ती बसलेली दिसली, की लगेच ते रिसेप्शनिस्टला सांगून त्याचे काम मार्गी लावत. नंतर आम्ही त्यांच्या बीव्हरेजेसच्या प्रोजक्टवरही काम केले. असे आमचे सगळे ग्राहक आणि विक्रीते आम्हाला शिकवत गेले आणि आमची बास्केट मोठी होत गेली. फूड इंडस्टरी्मधील सगळ्या क्षेत्रांत आम्ही काम करतो. कोणताही टॅग लागलेला नाही. डेअरी, चॉकलेट, बेकरी, रेडी टू ईट, पॅकेज्ड फूड अशा सगळ्या क्षेत्रांत गुंतवणुकीपासून मशिन्स, प्रक्रिया, उत्पादन,स्टोअरेज अशी सगळ्या विषयांत कन्सल्टन्सी आणि प्रत्यक्ष काम सुरू आहे. त्यामुळे २००८ मध् आमचे साताऱ् ये याजवळील कार्यालय सात हजार चौरस फुटांचे होते, तेथे आता पंचवीस हजार चौरस फुटांची बिल्डग झालेली आहे. सुरुवातीची तीन वर्षे आमची कसोटी पाहणारी ठरली. मात्र वैयक्तिक गरजा अतिशय कमी, गमावण्यासारखे काहीच नव्हते आणि पाय जमिनीवर घट्ट रोवलेले यांमुळे अगदी कोरोनाच्या साथीतील प्रतिकूल काळातूनही आम्ही व्यवस्थित बाहेर पडलो.’’
आर अँड डी सेंटर (रघुलीला) सुरु
२००८ मध्येच साताऱ्याजवळ कंपनीचे ‘रघुलीला’ हे संशोधन आणि विकास केंद्र सुरू झाले. ‘रघुलीला’ सध्या वर्षाला संशोधन आणि विकासविषयक २५ ते ३० प्रोजेक्ट करते.
२०१० मध्ये कंपनीकडे हिंदुस्थान युनिलिव्हरचा प्रोजेक्ट आला. त्यांना आईस्क्रीमच्या क्षेत्रात डेव्हलपमेंट करायच्या होत्या. ‘रघुलीला’साठी हा टर्निंग पॉईंट ठरला. ‘रघुलीला’च्या छोट्याशा यनिुटमध्ये उत्पादनही करून दाखविले. अशा रीतीने ‘रघुलीला’ने संशोधन आणि विकासाच्या कामासाठी पथदर्शक सुविधा उभारली. आज ‘रघुलीला’ प्रख्यात कंपन्यांच्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंटसाठी मोठे काम करते आहे. साताऱ्यासारख्या छोट्या शहरात एमटीआर, पेप्सिको, ॲमवे, टाटा, कॅडबरी असे अनेक नामांकित ब्रँड व कंपन्यांसाठीचे काम ‘रघुलीला’च्या R & D सेंटरवर होते. थर्ड पार्टी मॅन्युफॅक्चरर म्हणून कंपनी वेगवेगळ्या कंपन्यांसाठी चॉकलेट्स, स्प्रेड्स, प्रोटीन बार, हेल्थ ड्रिंक्स, जेलीज् अशी उत्पादने बनवून देते. २०१५-१६ मध्ये ग्लोबल कन्झ्मयुर प्रॉडक्ट्स कंपनीकडून चॉकलेट प्रॉडक्ट डेव्हलप करून देण्याचा प्रोजेक्ट आला. नंतर त्यांनी ‘रघुलीला’ला सांगितले, की ‘तुम्हीच आम्हाला चॉकलेट बनवून द्या.’ ग्लोबलकडून आवश्यक ते पाठबळ मिळाले आणि ‘रघुलीला’ने हे आव्हान पेलले. भारतातील सर्वोत्तम चॉकलेट्स साताऱ्यात ‘रघुलीला’ येथे तयार होतात.
मशीन विकसित करणारी ‘मॅट्रिक्स’
प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंटमध्ये कंपनीने अनेक प्रकल्प केले आणि करीत आहे. आता प्रोसेस डेव्हलपमेंटसाठी वेगळे काहीतरी करणे आवश्यक होते. प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्येप्रोजेक्ट कॉस्ट आणि ऑटोमेशन कॉस्ट हा नेहमी भेडसावणारा प्रश्न. कारण हा सर्व कॉस्ट प्रॉडक्टवर येऊन तो स्पर्धात्मक किमतीत विकणे हे खूप कसरतीचे काम होते. ‘मॅट्रिक्स’ला ही संधी दिसली आणि प्रोजेक्ट कॉस्ट कमी करण्याकरिता, नॉन कोअर मशिन्स बाहेरून न घेता त्या येथेच विकसित करण्याचे काम सुरू केले. त्यामुळे प्रोजेक्ट कॉस्ट २५-३० टक्क्यांनी कमी होऊ लागली. हे फक्त रीजनल कंपनीने अंगीकारले नाही, तर बहुराष्ट्रीय कंपन्यांनी देखील याचा फायदा घेतला.
अगदी घरचे उदाहरण द्यायचे झाले, तर ज्या वेळेस ‘रघुलीला’ला चॉकलेट बनविण्याची संधी मिळाली, त्या वेळी गुंतवणूक कमी कशी करता येईल याचा विचार करून, चॉकलेट उत्पादनासाठी लागणारी उपकरणे आम्ही साताऱ्यात विकसित केली. २०१६-१७ ला स्थापित झालेली ‘मॅट्रिक्स’ आता देशात आणि परदेशात आपली उत्पादने विकते. स्वस्त देण्यापेक्षा जागतिक दर्जाची यंत्रसामग्री रास्त किमतीत देणे, हे ‘मॅट्रिक्स’चे ब्रीदवाक्य आहे. ‘मॅट्रिक्स’च्या प्रॉडक्ट्सचे उत्पादन सातारा आणि पुण्यातून केले जाते.
स्टार्टअपसाठीच्या सेवा
कोरोनानंतरच्या काळात कंपनीने स्टार्टअप्सबरोबर काम सुरू केले आहे. सध्या कंपनी १४ विविध स्टार्टअप्सबरोबर काम करीत आहे. आतापर्यंत कंपनीने ५० हून अधिक स्टार्टअप्सबरोबर अंमलबजावणीच्या पातळीपर्यंत काम केले आहे. ओमप्रकाश यादव सांगतात, ‘‘स्टार्टअप्सकडे फंड, मार्टिकेग, ब्रँडिंग, व्यावसायिक स्केलेबिलिटी अशा फांट एंडच्या सगळ्या गोष्टी जबरदस्त असतात. मात्र बॅक एंडला स्टार्टअप खूपच वीक असतात आणि ‘रघुलीला’ बॅक एंडला खूपच स्राँट्ग असल्याने प्रॉडक्ट डेव्हलपमेंटपासून प्रोसेस, कॉस्ट, शेल्फ लाईफ, पॅकेजिंग, एमआरपी निश्चित करणे, प्रॉडक्ट यूएसपी आयडटिें फाय करणे, अशा सर्व सुविधा एका छताखाली देण्याची कंपनीची क्षमता आहे. स्टार्टअप्सच्या डोक्यातील कल्पना सत्यात उतरविण्याच्या कामात ‘रघुलीला’ खूपच सरस ठरते.’’
कर्मचाऱ्यांच्या हितासाठी…
फूड इंडस्ट्रीसाठी लागणारी मशिन्स विकसित करण्यात आणि ती तयार करण्यात आमचे सहकारी जगदीश चौहान यांचा हात धरणारा कोणी नव्हता. दुर्दैवाने कोरोनाच्या काळात त्यांचे निधन झाले. नंतर त्यांची पत्नी-मुले छत्तीसगढमधील त्यांच्या मूळ गावी गेली. मात्र आजही जगदीशला मिळणाऱ्या पगारापैकी निम्मा पगार त्याच्या कुटुंबाला नियमितपणे पाठविला जातो. अगदी कोरोना काळातही सर्व कर्मचाऱ्यांच्या घरी, अगदी नोकरी सोडून गेलेल्यांच्यादेखील घरी महिन्याला छोटीशी का होईना रक्कम पाठविली जात होती.
महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात प्रभावी कार्य
महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात कंपनी जाणीवपूर्वक आणि प्रभावीपणे काम करते आहे. त्याविषयी मनीष अंतवाल सांगतात, ‘‘निमशहरी अथवा ग्रामीण भागातील कु टुंबाच्या अडचणी वेगळ्या असतात, बऱ्याच घरात अत्यल्प शेती, तुटपुंजी नोकरी, जास्त जबाबदाऱ्या. काही ठिकाणी व्यसाधीनता, तर काही ठिकाणी कर्त्या पुरुषाचे आकस्मिक निधन हे सर्व कसोटी पाहणारे असते. अशा वेळी घरातील स्त्रीला बाहेर पडून काही काम बघणे आवश्यक होऊन जाते. ‘रघुलीला’ने या अडचणींवर मात करण्यासाठी थोडा हातभार लावला आहे. ६०-७० महिला येथे वेगवेगळ्या कामांची जबाबदारी अतिशय व्यवस्थित सांभाळत आहेत. लाखो रुपयांच्या मशिन्स त्या विनासायास चालवीत आहेत, मोठमोठ्या कंपनीचे प्रॉडक्ट डेव्हलप करीत आहेत. हे करीत असताना त्यांच्या कुटुंबाला आर्थिकदृष्टया थोडे साहाय्य झाले आहे. काही महिलांची घरे, मुलांचे उच्च शिक्षण, दुचाकी वाहने, घरातल्या काही गरजेच्या वस्तू अशा अनेक गोष्टी साध्य करता आल्या आहेत. त्यात त्यांना आनंद आहे आपण कर्त्या असण्याचा आणि आत्मनिर्भर होण्याचा.
लाजवाब ‘मिष्ट्री’
एवढे ब्रँड, एवढ्या कं पन्या, एवढे प्रॉडक्ट आजपर्यंत आपण बनविले, एक छोटा प्रयत्न स्वतःचा ब्रँड बनविण्याचा का करू नये, असा विचार पुढे आल्याने गेल्या वर्षी कं पनीने स्वत:चा ‘मिष्ट्री’ हा ब्रँड लाँच के ला. हा ब्रँड हा फक्त एक्स्क्लुझिव्ह आऊटलेट्स आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून विकण्यात येतो. सध्या या ब्रँडच्या उत्पादनांचे तीन आऊटलेट पश्चिम महाराष्ट्रात आहेत. लवकरच ते पंचवीसपर्यंत न्यायचा कं पनीचा मनोदय आहे. साताऱ्याचे स्वतःचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे चॉकलेट या निमित्ताने सर्वदुर पोहोचणार आहे. या निमित्ताने शुंभकर काळे यांच्या रूपाने नव्या पिढीने व्यवसायात पदार्पण केले आहे. त्याचबरोबर नव्या कल्पना, विस्तार यासाठी कंपनी विविध पातळ्यांवर कार्यरत आहे.
आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे प्रतिनिधित्व
इंग्लंडस्थित BAKER PERKINS बरोबर २००६-०७ ला करार झाल्यानंतर, काही वर्षांत इटलीतील SACMI ( पूर्वाश्रमीची CMOPM ) कंपनीचे प्रतिनिधित्व करायची संधी २०११-१२ च्या दरम्यान मिळाली. आता CAOTECH नेदरलँड् स, MICROTEK इंग्लंड, PINCOSA स्वित्झर्लंड, BRALYX ब्राझील अशा विविध कं पन्यांसाठी आम्ही प्रतिनिधित्व करतो. नुकताच SCHENCK ग्रुप जर्मनीबरोबर आमचा करार झाला. या सर्व प्रथितयश कंपन्यांची उत्पादने जगातील नामांकित कं पन्या त्यांचे ब्रँड निर्माण करण्यासाठी वापरतात.