‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’चे सीईओ आणि संस्थापक मनोहर जगताप यांनी २००८ मध्ये ‘मायबोली’ या मराठी मनोरंजन वाहिनीच्या रूपात उद्योगविश्वात पदार्पण केले. कोणताही अनुभव नसताना आणि कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना त्यांनी हे धाडस केले. यानंतर पुढील बराच काळ ‘मायबोली मराठी वाहिनी’ उभी करण्यासाठी ते अथक परिश्रम करीत राहिले. बऱ्याचदा अपयश पदरी पडले, मात्र त्यामुळे ते खचून गेले नाहीत, तर आणखी जिद्दीने आणि चिकाटीने काम करीत राहिले. डोक्यात अनेक संकल्पना ठेवून त्यांनी उद्योगविश्व उभारण्याचे स्वप्न पाहिले. याला अनुसरून त्यांनी पुन्हा आपल्या प्रयत्नांना जोर देऊन भारतात परकीय गुंतवणूक आणण्यासाठी धडपड सुरू केली. आता स्वप्न फक्त एका मराठी वाहिनीपुरते मर्यादित न राहता एक औद्योगिक विश्व तयार करण्याचे होते.
एका बाजूला भारतात परकीय गुंतवणूक आणण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसऱ्या बाजूला त्यांनी अनेक क्षेत्रांत आपल्या व्यवसायाची बीजे रोवण्यास सुरुवात केली. यादरम्यान अनेक कारणांमुळे सहन करावी लागणारी पीछेहाट आणि आर्थिक ताणाच्या प्रसंगांना त्यांना सामोरे जावे लागले.